'या' देशात फेसबुक आणि व्हॉट्सऍपवर लावला कर; मग झाले असे काही... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

'या' देशात फेसबुक आणि व्हॉट्सऍपवर लावला कर; मग झाले असे काही...

वेब टीम : लेबनॉन स्मार्टफोन आणि सोशल मीडिया या एका नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. या दोन्ही शिवाय युजर्सचे आयुष्य अवघड झाले आहे. हे चित...

वेब टीम : लेबनॉन
स्मार्टफोन आणि सोशल मीडिया या एका नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. या दोन्ही शिवाय युजर्सचे आयुष्य अवघड झाले आहे. हे चित्र आजकाल सर्वत्र पहायला मिळते.

सोशल मीडियावर घातलेली बंधने कोणत्या थराला जाऊ शकतात याचे उदाहरण लेबनॉनमध्ये दिसते.

लेबनॉन सरकारने व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक या सोशल मीडिया माध्यमांवर कर लावण्याचा निर्णय घेतला आणि नागरिकांनी याचा विरोध करत संपूर्ण शहरात हिंसक आंदोलन सुरू केले.

लेबनॉनमधील शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसक आंदोलन सुरू आहे.

सरकारच्या या निर्णयानंतर नागरिकांनी फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर लावलेला कर मागे घेण्याची मागणी केली होती.

त्यानंतर यावर विचार करत सरकारने हा कर मागे घेण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यानंतरही लोकांचा राग मात्र शांत झालेला नाही.

कर मागे घेतल्यानंतरही लोकांनी मोठ्या प्रमाणात शहरात जाळपोळ केली. या सरकारने फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप कॉलसाठी ०.२० डॉलर्सचा कर लावला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत