भाजपची खेळी ; सेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

भाजपची खेळी ; सेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव

मुंबई : वेबटीम  राज्यात सत्ता स्थापनेबाबत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात बैठकांचं सत्र सुरू असून चर्चा अंतिम टप्प्यात आली आ...

मुंबई : वेबटीम 
राज्यात सत्ता स्थापनेबाबत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात बैठकांचं सत्र सुरू असून चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. पुढच्या 24 तासांत सत्ता स्थापनेबाबत महाविकासआघाडी घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे भाजपची पुन्हा एकदा नवी खेळी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरु आहे. भाजपने मात्र मौन बाळगले होते. भाजपने आपण 'वेट अ‍ॅण्ड वॉच'ची भूमिका घेतली होती. आता मात्र भाजपने शिवसेनेला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे.
दैनिक 'लोकसत्ता'ने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपने गुरूवारी शिवसेनेला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत