लोणीत गोळीबार; एक ठार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

लोणीत गोळीबार; एक ठार

लोणी : प्रतिनिधी                            राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मयत तरुण हा श्...

लोणी : प्रतिनिधी                            राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मयत तरुण हा श्रीरामपूर येथील असून फरदीन अबू कुरेशी (वय 18) रा. वॉर्ड 2, बीफ मार्केट जवळ, श्रीरामपूर असे या तरुणाचे नाव आहे. लोणी येथील हॉटेल साई छत्रपती येथे रविवारी (1 डिसेंबर) रात्री 9 वाजता ही हत्या करण्यात आली.
याबाबत लोणी पोलीस ठाण्यात आशा अबू कुरेशी रा. श्रीरामपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष सुरेश कांबळे, सिराज उर्फ सोल्जर आयुब शेख, शाहरुख शहा (सर्व रा. श्रीरामपूर), उमेश नागरे, अरुण चौधरी, अक्षय बनसोडे ,शुभम कदम (सर्व रा. लोणी) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करत आहेत. दरम्यान हा खून का झाला, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत