विखेना पक्षात घेऊन तोटाच झाला ; राम शिंदे यांचा आरोप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विखेना पक्षात घेऊन तोटाच झाला ; राम शिंदे यांचा आरोप

अहमदनगर : वेबटीम एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांनी त्यांची नाराजी थेट सभेत बोलून दाखविल्यानंतर आता भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे या...

अहमदनगर : वेबटीम
एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांनी त्यांची नाराजी थेट सभेत बोलून दाखविल्यानंतर आता भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी देखील त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेऊन फायदा तर झाला नाही उलट त्यांच्यामुळे आमचं नुकसानच झाल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. यावेळी राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे पाटील तसेच मधुकरराव पिचड यांच्यावर निशाणा साधला. राम शिंदे यांच्यासोबत माजी आमदार शिवाजी कर्डिले व स्नेहलता कोल्हे यांनी देखील त्यांची नाराजी बोलून दाखविली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील 12 जागांवर झालेल्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी आशिष शेलार नगर जिल्ह्यात आले होते. यावेळी पराभूत झालेल्या बाराही उमेदवारांसोबत त्यांनी बैठक घेतली. त्या बैठकीनंतर राम शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांची नाराजी व्यक्त केली. ‘पराभूत उमेदवारांची पराभवाची कारणे काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आशिष शेलार यांना नियुक्त केलं आहे. पूर्वी नगर जिल्ह्यात पाच आमदार होते. किंबहूना निवडणुकीच्या आधी मधुकर पिचड, राधाकृष्ण विखे पाटील पक्षात आल्याने ती संख्या सातवर गेली होती. या निवडणूकीत या आकड्यात वाढ होणं अपेक्षित होतं. मात्र ती संख्या होती त्या पेक्षा कमी होऊन तीनवर आली आहे’, अशी टीका राम शिंदे यांनी केली आहे.
राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखें-पाटील यांच्या ’12 आमदार निवडणून आणू’ या दाव्यावरही टीका केली. ‘निवडणुकीत विखेंनी सांगितलं होतं की ही भाजपच्या आमदारांची संख्या 12 करू मात्र तसं काहीही झालेलं नाही. विखे यांची फार काही मोठी ताकद नव्हती. उलट त्यांची पूर्वापार परंपरा राहिली आहे की ते ज्या पक्षात जातात त्या पक्षात खोड्या करतात. त्या पक्षासाठी हानीकारक वातावरण निर्माण करतात. ते पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलं आहे.’, अशा शब्दात राम शिंदे यांनी विखे पाटलांवर निशाणा साधला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत