अहमदनगर : वेबटीम। शेतकर्यांनी अतिशय कष्ट करून पिकवलेला कांदा मातीमोल किमतीत विकला जात आहे. या गोष्टीचा देशाचे पंतप्रधान नरें...
अहमदनगर : वेबटीम।
शेतकर्यांनी अतिशय कष्ट करून पिकवलेला कांदा मातीमोल किमतीत विकला जात आहे. या गोष्टीचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांभीर्याने विचार करून शेतकर्यांना दिलासा देत, केंद्र शासनाच्या वतीने थेट 20 रुपये किलो दराने कांदा खरेदी करावा, अशा मागणीचे पत्र चांदेकसारे येथील शेतकरी राहुल भगीरथ होन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.
एकरी 40 हजार पेक्षाही जास्त खर्च कांदा पिकवण्यासाठी शेतकर्यांना येत असतो. त्यात ह्या वर्षी अतिशय तापमान असल्याने कांदा टिकण्याचे प्रमाण कमी झाले. शेतकर्यांनी आपल्या शेतातील कांदा काढून चाळी देखील भरलेल्या आहे, मात्र अतिशय तापमानामुळे कांद्या सडण्याचे प्रमाण जवळपास 50 टक्केच्या वरती गेले आहे.त्यामुळे कोणताच पर्याय नसल्याने शेतकर्यांना आपल्या चाळीतील कांदा वेळेअभावी विकावा लागत आहे. चार ते पाच रुपये किलो दराने शेतकर्यांना हा कांदा विकावा लागतो आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या पदरात कांद्यासाठी खर्च केलेले पैसेही पडत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. ही गंभीर बाब आहे.
कांदा जीवनावश्यक वस्तूतून काढला तरीदेखील कोरोना व्हायरसचे महाप्रचंड तांडव असल्यामुळे कांदा खरेदीचे प्रमाण कमी आहे. फेब्रुवारीमध्ये कांद्याचा बाजारभाव जवळपास अडीच हजार रुपये होता. तोच बाजार भाव टिकून राहील, अशी अपेक्षा शेतकर्यांना होती मात्र त्यांची ही अपेक्षा अति तापमान व कोरोना व्हायरस या गंभीर संकटामुळे फोल ठरली.
आता केंद्र सरकारनेच या गोष्टीत लक्ष घालून शेतकर्यांना दिलासा द्यावा, म्हणून कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील शेतकरी राहुल भगीरथ होन यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र पाठवले आहे. केंद्र सरकारने थेट कांदा खरेदी करून शेतकर्यांना किमान वीस रुपये किलो दराने भाव द्यावा, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत