नगर जिल्ह्यातील या तालुक्यात सापडले कोरोनाचे 7 रुग्ण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नगर जिल्ह्यातील या तालुक्यात सापडले कोरोनाचे 7 रुग्ण

वेबटीम संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एकाच कुटुंबातील तिघा जणांना तर शहरातील चार अशा एकूण  सात जणांना काल शुक्रवारी एकाच दिवशी को...

वेबटीम
संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एकाच कुटुंबातील तिघा जणांना तर शहरातील चार अशा एकूण  सात जणांना काल शुक्रवारी एकाच दिवशी कोरोनाची लागण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, तालुक्यातील कोरोनाबधित रुग्णांचा आकडा 80  वर  जाऊन पोचल्यामुळे प्रशासनाने उपाययोजनांचा वेग वाढवला आहे.
संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये कोरोनाबधित रुग्णाची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. त्यात गुरुवारी संगमनेरमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण वाढण्यात खंड पडला होता. त्यानंतर काल शुक्रवारी सकाळीच संगमनेर तालुक्यातील निमोण येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबातील 36 वर्षीय महिलेला, 18 वर्षीय तरुणाला आणि एका 14 वर्षांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली असल्यामुळे आता संपूर्ण तालुक्यातील कोरोना बाधित  रुग्णाचा  आकडा 30 वर जाऊन पोहचला आहे.
संगमनेर शहरातील लखमीपुरा भागातील  32 वर्षीय महिलेला तर याच लाखमीपुरातील 45 वर्षीय पुरुषाला, मोगलपुरातील 48 वर्षीय महिलेला, दाते मळा येथील 38 वर्षीय महिलेला आशा चार जणांना एकाच दिवशी कोरोनाची लागण झाल्यामुळे  संगमनेर शहराचा कोरोना बधित रुग्णाचा आकडा 42 वर जाऊन पोहचला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत