आवाज जनतेच्या मध्ये आम्ही या चुकीच्या कारभाराचा पुराव्यानिशी पर्दाफाश केल्यानंतर अनेकांना मिरच्या झोम्बल्या. काहींनी चर्चेसाठी माणस...
आवाज जनतेच्या मध्ये आम्ही या चुकीच्या कारभाराचा पुराव्यानिशी पर्दाफाश केल्यानंतर अनेकांना मिरच्या झोम्बल्या. काहींनी चर्चेसाठी माणसे पाठविली, तर काहींनी हे आमच्या काळातील नाही असे सांगून हे सर्व बाहेर काढा, अशी विनंती केली, काहींनी अजून काही धक्कादायक कारभाराचे पुरावेही आमच्याकडे गुपचूप आणून दिले, त्या गावातील तरुणांचाही आवाज आता बाहेर येऊ लागला आहे, आशा प्रकारे बदल घडत असताना आम्हाला समाधान वाटत आहे, असो, कथेकडे वळूया...! आटपाट नगरीत राज दरबारात जनतेच्या पैशांची राजरोस उधळपट्टी झाली असताना अजूनही बिचारी जनता अनभिज्ञ होती, आपण पाहत असलेल्या ' त्या, वर्षातील हिशोबात यापूर्वी परिसर स्वछता 53,568, किरकोळ खर्च 35,610 तसेच काट्या काढणे 22,560, मुरूम टाकणे 56,600 असा वर्षात 1 लाख 60 रुपया पेक्षा अधिक खर्च हा संशयास्पद असा वाटणार होता, आता त्यात भर म्हणजे स्मशानभूमी स्वछता करण्यासाठी वर्षभरात 54 हजार 346 रुपये खर्च दाखविण्यात आल्याने अनेकांच्या डोक्याला मुंग्या आल्याशिवाय राहणार नाही, याशिवाय सार्वजनिक आरोग्य या नावाखाली तब्बल 59 हजार रुपयांचा दरबारातील लोकांनी खर्च केला असल्याची धक्कादायक माहिती हाती लागली आहे.
, या वर्षात झालेला हा सुमारे पावणे तीन लाख रुपयांचा खर्च चौकशीस पात्र आहे, याची चौकशी होवो अथवा न व्होवो, मात्र आम्ही जनतेचा हा आवाज या माहितीद्वारे वाचकांपर्यंत पोचविण्याचे प्रयत्न केला आहे, यातून जनता लगेचच जागी होईल, कोणती क्रांती घडेल, किंवा दरबारातील कारभार सुधारेल, असेही काही नाही, कारण खरा झोपलेला उठविण्यापेक्षा वास्तवात झोपेचे सोंग घेतलेल्याना जागे करणे अवघड असते, विशेष म्हणजे हे सर्व माहिती असतानाही आम्ही तो प्रयत्न करतोय आणि यापुढेही करणार..🙏


कोणत्याही टिप्पण्या नाहीत