खोटी बिले काढण्याचा प्रयत्न झाला ; सदस्यांचा असंतोष उफाळून आला ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

खोटी बिले काढण्याचा प्रयत्न झाला ; सदस्यांचा असंतोष उफाळून आला !

गावातील गोरगरीब जनता आपल्यावर मोठा विश्‍वास ठेवून घरपट्टी, पाणीपट्टी रुपी कर भरते. ग्राम दरबारातील कर्मचारीही मोठ्या सक्तीने तशी वसूली करत...

गावातील गोरगरीब जनता आपल्यावर मोठा विश्‍वास ठेवून घरपट्टी, पाणीपट्टी रुपी कर भरते. ग्राम दरबारातील कर्मचारीही मोठ्या सक्तीने तशी वसूली करतात, मात्र, ही रक्कम खरचं कोणत्या कामावर खर्च होते, या रक्कमेचं नेमकं काय केलं जात ? याचे सर्वांना कुतुहूल असणारचं. खरतर हा खर्च कुठं केला जातो,गावात पाच वर्षात काट्या केवढ्याच्या काढल्या, गावात लिकेजवर किती खर्च केला, मुरूमसाठी किती रुपये वापरले, स्मशानभूमी स्वछता कितीची केली, गावात बल्ब किती व केवढ्याच्या बसवले, किरकोळ खर्च किती झाला? इत्यादी विषय आपल्याला पुराव्यानिशी आम्ही सादर करणार आहोतच. मात्र हे समजल्यावर गावकर्‍यांचाही संताप अनावर होणार हे नक्की. तूर्त, अंगणवाडी साहित्य खरेदी विषयापूर्वी एक आंनदायी व तितकीच महत्वाची बाब आपण पाहणार आहोत, या गावच्या पैशातून चुकीच्या खर्चाला उशीरा का होईना आता ग्राम दरबारातील गाव प्रमुखासह अन्य सदस्यांनी उघड विरोध सुरू केल्याने याविषयी त्या गावात मोठी चर्चा सुरू झाली. आटापट नगरीतील राजकारण तसं लईचं वेगळ. येथील ग्राम दरबारातील ( सदस्य) सेवकांमध्ये जिरवा जिरवी आणि फुगवा फुगवीमुळे तशी नेहमीच धुसफूस सुरू असे. अर्थात तोंडावर कुणी बोलत नसले तरी येेथे पाठीमागे एकमेकांवर तोंडसुख घेण्याची संधी कुणीही सोडत नसे, मात्र, आता अनेकांची सहन शीलता संपल्याने एकमेकांना उघडपणे विरोध सुरू झाल्याचे पहायला मिळू लागले. काही दिवसांपुर्वी झालेल्या ग्रामदरबारातील बैठकीत अनेक सदस्यांनी चुकीचे ‘बिले’ काढण्यासाठी प्रखर विरोध केल्याचे ग्रामस्थांच्या कानावर पडले होते. यात 17 हजार आणि 6 हजारांच्या अशी दोन बिले काढण्यासाठी काहींनी आग्रह धरला होता, अशी माहिती आता काही कमिटीचे सदस्य खुलेआम बोलताना दिसु लागले, शिवाय. आम्ही त्यास विरोध केला, आम्हाला विचारल्याशिवाय एकही बील काढायचे नाही, आमच्यावर लोकांचा विश्वास आहे, त्यांचा पैसा बोगस खर्च करू नका, लोक आम्हाला जाब विचारतील असा सज्जड दम दरबारातील ‘त्या’ भाऊसाहेबांना भरल्याचे बोलले जाऊ लागले, उपस्थित सर्व सदस्यांनी ही बिले काढण्यासाठी विरोध केल्याने गावात खऱ्या अर्थाने क्रांतीला सुरुवात झाली होती. दरम्यान, बैठकित विरोध झाल्याने एकच गोंधळ उडाला, त्यातून बाचाबाचीही झाल्याचे कानावर पडले होते. अखेर भाऊसाहेबांनीही धाडस दाखवत ही बीले काढणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर हा वाद तूर्त संपुष्टात आला, मात्र ती धग संपणारी नव्हती. खरतर, या लोकांनी चुकीच्या गोष्टीला केलेला विरोध त्या गावच्या लोकांच्या कानावर जाताच विरोध करणाऱ्या सर्व सदस्यांचे मोठे कौतुक केले जाऊ लागले, त्यामुळे उघड आणि अप्रत्यक्ष विरोध करणाऱ्या या सदस्यांनाही पाच वर्षातील काही चुकांचे प्रायश्चित केल्यासारखे समाधान मिळू लागले, असो, आता पुढे दोन दिवसानंतर ग्राम दरबारात पुन्हा एक बैठक आयोजित केली होती, त्यात पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता होतीच, त्यामुळे त्या बैठकीत काय काय घडतंय, कोणती बिले मंजूर झाली, कोणी विरोध केला, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष होते. त्या बैठकीत नेमके काय घडले, ते जाणून घेऊ लवकरच...भाग (3) टीप :आजच्या कथेचा कोणत्याही गावाशी संबंध नाही, आल्यास योगायोग समजावा ही विनंती.भेटुयात उद्याच्या भागात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत