सैन्यदलात नोकरीचे आमिष दाखवून लुटणारा तोतया अधिकारी जेरबंद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सैन्यदलात नोकरीचे आमिष दाखवून लुटणारा तोतया अधिकारी जेरबंद

नगर:   लष्करामध्ये अधिकारी असल्याचे सांगून लोकांना सैन्य दलामध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून आर्थिक व्यवहार करून फसवणूक करणाऱ्या तोतयाल...

नगर: 
लष्करामध्ये अधिकारी असल्याचे सांगून लोकांना सैन्य दलामध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून आर्थिक व्यवहार करून फसवणूक करणाऱ्या तोतयाला पोलिसांनी जेरबंद केले आहे.  प्रशांत भाऊराव पाटील ( रा.खानापूर, बेळगाव, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे.
मिलेट्री इंटेलिजन्सच्या जम्मु काश्मिर येथील युनिटने नगरचे पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना नगरमध्ये सैन्य दलात नोकरीस नसतानाही सैन्यदलाचा ड्रेस घालून एक व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार संबंधित व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून पकडले. या व्यक्तीला त्याचे नाव विचारले असता त्याने प्रशांत भाऊराव पाटील असे सांगितले. यावेळी संबंधित व्यक्तीच्या अंगावर सैन्यदलाचा मेजर रँकचा युनिफॉर्म होता. त्यामुळे त्याची स्थानिक मिलेट्री इंटेलिजन्सच्या कर्मचाऱ्यांनी पंचासमक्ष चौकशी केली. सध्याचे नेमणुकीचे ठिकाण, पदाबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर पोलिसांनी त्याच्या कारची व घराची झडती घेतली असता, त्यामध्ये लष्कराचे बनावट ओळखपत्र, लष्कराच्या ड्रेसवर लावण्याचे चिन्ह व फित, नेम प्लेट, लष्कराचे कॅन्टींन कार्ड, सैन्यदलात नोकरीसाठी वेगवेगळ्या लोकांकडून भरून घेण्यात आलेले आवेदन पत्र, दोन लष्कराचे मेजर रँकच्या अधिकाऱ्याचे ड्रेस, तीन लष्कराचे साधे ड्रेस, ‘ऑन आर्मी ड्युटी’ असा लिहिलेला बोर्ड, लष्कराचे चिन्ह असलेली गाडीची नंबरप्लेट आदी साहित्य मिळून आले आहे. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्यावर नगरच्या एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.


पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत