पंढरीची वारी चुकेल, पण पांडुरंगाचे दर्शन नाही हुकणार ; नक्की वाचा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पंढरीची वारी चुकेल, पण पांडुरंगाचे दर्शन नाही हुकणार ; नक्की वाचा

पंढरपूर : करोनाच्या आपत्तीनंतर सर्वत्र ऑनलाइन संवादावर भर देण्यात येत आहे. या ऑनलाइन विश्वापासून यंदा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे पं...

पंढरपूर : करोनाच्या आपत्तीनंतर सर्वत्र ऑनलाइन संवादावर भर देण्यात येत आहे. या ऑनलाइन विश्वापासून यंदा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे पंढरपूरदेखील दूर राहीलेले नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच अनेक भाविकांना वारीला मुकावे लागले असले तरीही पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी समितीने भाविकांना ऑनलाइन दर्शनासाठी पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सर्व मंदिरांप्रमाणे यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरदेखील दर्शनासाठी बंद आहे. १ जुलै रोजी असणाऱ्या आषाढी एकादशीच्या दिवशी भाविकांना पंढरीनाथाचे दर्शन घडावे, मंदिर समितीने वेबसाईटद्वारे दर्शन व्यवस्था केली आहे. भाविकांना http://www.vithalrukminimandir.org या वेबसाईटवर थेट ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. याशिवाय भाविकांना गुगल प्ले स्टोअरवरदेखील श्री विठ्ठल रूक्मिणी लाईव्ह दर्शन हे ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पालखी वाहनाद्वारे यंदा पंढरपुरास नेण्यात येऊन परंपरा अबाधित राखली जाणार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत