मुंबई : वेबटीम कोरोना आल्यापासून अर्थव्यवस्था कोलमडली, उद्योग धंदे बंद झाले, हाताला काम राहिले नाही, पैसा आडकाही सम्पला, जगावं कस समज...
मुंबई : वेबटीम
एकतर कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलंय. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, अनेकांची पगार कपात झालीये. अशात कोरोना हॉस्पिटल्सकडून कोरोना रुग्णांची मात्र लुटालूट होतेय. सर्वसामान्य नागरिकांना खासगी कोविड रुग्णालयाची बिलं परवडेनाशी आहेत. जादा बिलं आकारल्यामुळे काही रुग्णालयाचे लायसन्सेस रद्द झालेत, तर काहींवर कारवाई झालीये. अशात विरारमध्ये अशीच एक घटना घडली आहे अशी माहिती आहे. अवाच्यासव्वा बिल आल्याने रुग्णालयातील एक कोरोना रुग्ण चक्क रुग्णालयातून पळून गेल्याचं समजले, विरामधील वल्लभ रुग्णालयात हा प्रकार घडलाय.
कोरोना आल्यापासून अर्थव्यवस्था कोलमडली, उद्योग धंदे बंद झाले, हाताला काम राहिले नाही, पैसा आडकाही सम्पला, जगावं कस समजेनासे झाले, त्यातच कोरोना नशिबी आला, अशा अनंत अडचणीत उपचार पूर्ण झाले, मात्र डॉक्टरांनी 1 लाख 30 हजाराचे बिल हातात टेकवताच या बहादराने मागचा पुढचा विचार न करता रुग्णालयातूनच धूम ठोकल्याची घटना नुकतीच घडली.
एकतर कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलंय. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, अनेकांची पगार कपात झालीये. अशात कोरोना हॉस्पिटल्सकडून कोरोना रुग्णांची मात्र लुटालूट होतेय. सर्वसामान्य नागरिकांना खासगी कोविड रुग्णालयाची बिलं परवडेनाशी आहेत. जादा बिलं आकारल्यामुळे काही रुग्णालयाचे लायसन्सेस रद्द झालेत, तर काहींवर कारवाई झालीये. अशात विरारमध्ये अशीच एक घटना घडली आहे अशी माहिती आहे. अवाच्यासव्वा बिल आल्याने रुग्णालयातील एक कोरोना रुग्ण चक्क रुग्णालयातून पळून गेल्याचं समजले, विरामधील वल्लभ रुग्णालयात हा प्रकार घडलाय.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत