घाबरू नका, संकटाशी सैनिकाप्रमाणे लढा : संतोष ढोकणे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

घाबरू नका, संकटाशी सैनिकाप्रमाणे लढा : संतोष ढोकणे

उंबरे : वेबटीम      कोरोना हा कोणालाही होऊ शकतो, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, तो मोठा आजार नाही, मात्र त्यावर मात करण्यासाठी मनात प्...

उंबरे : वेबटीम 
    कोरोना हा कोणालाही होऊ शकतो, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, तो मोठा आजार नाही, मात्र त्यावर मात करण्यासाठी मनात प्रचंड आत्मविश्वास ठेवा, त्यादृष्टीने सुरक्षितता बाळगा,  सर्व ग्रामस्थांनी देखील एकत्र येऊन या संकटाचा सामना करावा, आपले कुटुंब, आपले गाव सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी एका सैनिकाप्रमाणे लढावे, असे आवाहन माजी सरपंच संतोष ढोकणे यांनी केले आहे.   
                     ढोकणे यांनी सांगितले की, सध्या कोरोनाचे  दिवस चालु आहे, कोरोना कोणालाही  होऊ शकतो, मात्र  त्याला लाजायच नाही किंवा घाबरायच नाही, ही वेळ सगळ्यांवर आहे. त्यामुळे प्रत्येकाने दक्ष राहण्याची गरज आहे, त्यासाठी आपण फक्त काही लक्षण वाटल्यास किंवा  आपण कोणत्या कोराना बाधीत लोकांच्या संपर्कात आलो असे आपल्याला माहीत असले तर आपण स्वतःहा होऊन कोरांटाईन होऊन आपली, आपल्या कुटुंबाची, आपल्या मित्र परीवाराची आपल्या गावाची सेवा केल्यासारख योगदान आहे. आपल्याला न लाजता एका सैनिकासारख काम करायच आहे. गावातील सगळ्या नागरीकांनी ह्या लढाईत सहभागी होऊन ही लढाई जिंकायची आहे. या वैश्विक कोरोना महामारीपुढे कोणी लहान नाही कोणी मोठा नाही,आपली एकी आणि समजुतदार पणातुन आपण ही लढाई जिंकु, असे आवाहन ढोकणे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत