श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्थेकडून अपघात विमा वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्थेकडून अपघात विमा वाटप

 श्रीगोंदा : विनोद डोळस   तालुक्यातील श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित काष्टी यांच्यावतीने सभासद व कर्जदार यांचे अपघात...

 श्रीगोंदा : विनोद डोळस
 तालुक्यातील श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित काष्टी यांच्यावतीने सभासद व कर्जदार यांचे अपघाती विमा उतरविण्यात आला होता त्यानुसार अपघात झालेल्या दोन कर्जदारांना रुग्णालयात विम्याची रक्कम देण्यात आली.
     
यावेळी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्था उत्तम कामकाज करीत असून संस्थेकडे 11 कोटीच्या ठेवी जमा झाल्या असून मागील आर्थिक वर्षात सन 2019 ते 2020 यामध्ये सस्थेला 15 लाख 63 हजार 24 रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती देण्यात आली.
       याप्रसंगी संस्थेचे सस्थापक दिपक नागवडे, सस्था अध्यक्ष आदेश नागवडे, व्यवस्थापक संतोष दातीर, विमा सलागार सुनील कटारिया यांच्या हस्ते अशोक रामचंद्र शिंदे ( रा. मढेवडगाव ), अनिल रामभाऊ लगड ( रा. कोळगाव ) यांना अपघात विम्याचा धनादेश देण्यात आला आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत