दिल्ली : ,वेबटीम एकीकडे सर्वसामान्य कर्जदार ग्राहकांचा एखादा लोन हप्ता थकला तरी बँक आपले लोकं पाठवून त्रास देते, मात्र याच बँकेची...
दिल्ली : ,वेबटीम
'पंजाब' बँकेला१५ हजार कोटींचा चुना
भारतीय रिझव्ह बँकने दिलेल्या माहितीनुसार पंजाब नॅशनल बँकेद्वारे एक एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या काळात फसवणुकीच्या ३९५ प्रकरणांची माहिती देण्यात आली. या सर्व प्रकरणात मिळून १५ हजार ३५४ कोटी रुपयांची फसवणुक झाली. गेल्या आर्थिक वर्षातील फसवणुक झालेल्या बँकेच्या यादीत PNB दुसऱ्या स्थानावर आहे. तर या यादीत तिसऱ्या स्थानावर बँक ऑफ बडोदा आहे. या बँकेला ३४९ प्रकरणात १२ हजार ५८६.६८ कोटींना चुना लागला. बँक ऑफ बडोदामध्ये विजया बँक आणि देना बँकेचे एकत्रिकरण १ एप्रिल २०१९ रोजी करण्यात आले.
युनियन बँकेची ९ हजार कोटींची फसवणूक
युनियन बँक ऑफ इंडियाला गेल्या आर्थिक वर्षात ४२४ प्रकरणात ९ हजार ३१६.८० कोटी, बँक ऑफ इंडिाला २०० प्रकरणात ८ हजार ०६९.१४ कोटी, कॅनेरा बँकेला २०८ प्रकरणात ७ हजार ५१९.३० कोटी, इंडियन ओव्हसीज बँकेला २०७ प्रकरणात ७ हजार २७५.४८ कोटी, अलाहाबाद बँकेला ८९६ प्रकरणात ६ हजार ९७३.९० कोटी तर युको बँकेला ११९ प्रकरणात ५ हजार ३८४.५३ कोटी रुपयांचा चुना लागला आहे.
बँक ऑफ महाराष्ट्राला ३ हजार ३९१ कोटींचा चुना
RBIने दिलेल्या माहितीनुसार एक एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० याकाळात ओरियंटल बँक ऑफ कॉमर्सची ३२९ प्रकरणात ५ हजार ३४०.८७ कोटींना, सिडिकेट बँकेची ४३८ प्रकरणात ४ हजार ९९९.०३ कोटींना, कॉर्पोरेशन बँकेची १२५ कोटी प्रकरणात ४,८१६.६० कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडियाची ९०० प्रकरणात ३ हजार ९९३.८२ कोटी, आंध्र बँकेची ११५ प्रकरणी ३ हजार ४६२.३२ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्रची ४१३ प्रकरणात ३ हजार ३९१.१३ कोटी, युनायडेट बँक ऑफ इंडियाची ८७ प्रकरणात २ हजार ६७९.७२ कोटी, इंडियन बँकेची २२५ प्रकरणात २ हजार २५४.११ कोटी आणि पंजाब आणि सिंध बँकेची ६७ प्रकरणात ३९७.२८ कोटींची फसवणुक झाली आहे. यासह अन्य बँक लुटल्या गेल्या आहेत
एकीकडे सर्वसामान्य कर्जदार ग्राहकांचा एखादा लोन हप्ता थकला तरी बँक आपले लोकं पाठवून त्रास देते, मात्र याच बँकेची अनेकांनी फसवणूक केल्याचे आता उघड झाले असून त्यात त्यांनी का कठोर भूमिका घेतली नाही असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०१९-२० या काळात सार्वजनिक क्षेतातील १८ बँकांनी एक लाख ४८ हजार ४२७.६५ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या १२ हजार ४६१ तक्रारी कळवल्या आहेत. ही माहिती माहितीच्या अधिकाराखाली देण्यात आली आहे.सर्वाधिक फसवणूक झाली SBIची माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मिळालेल्या आकडेवारीनुसार गेल्या आर्थिक वर्षात फसवणुकीचा सर्वात मोठा फटका बसला तो देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) होय. स्टेट बँक ऑफ इंडियाने या कालावधीत ४४ हजार ६१२.९३ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या ६ हजार ९६४ घटनांची माहिती दिली. ही रक्कम गेल्या आर्थिक वर्षातच्या (२०१८-१९)च्या १८ सरकारी बँकांच्या फसवणुकीच्या एकूण रक्कमेच्या ३० टक्के इतकी आहे.
'पंजाब' बँकेला१५ हजार कोटींचा चुना
भारतीय रिझव्ह बँकने दिलेल्या माहितीनुसार पंजाब नॅशनल बँकेद्वारे एक एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या काळात फसवणुकीच्या ३९५ प्रकरणांची माहिती देण्यात आली. या सर्व प्रकरणात मिळून १५ हजार ३५४ कोटी रुपयांची फसवणुक झाली. गेल्या आर्थिक वर्षातील फसवणुक झालेल्या बँकेच्या यादीत PNB दुसऱ्या स्थानावर आहे. तर या यादीत तिसऱ्या स्थानावर बँक ऑफ बडोदा आहे. या बँकेला ३४९ प्रकरणात १२ हजार ५८६.६८ कोटींना चुना लागला. बँक ऑफ बडोदामध्ये विजया बँक आणि देना बँकेचे एकत्रिकरण १ एप्रिल २०१९ रोजी करण्यात आले.
युनियन बँकेची ९ हजार कोटींची फसवणूक
युनियन बँक ऑफ इंडियाला गेल्या आर्थिक वर्षात ४२४ प्रकरणात ९ हजार ३१६.८० कोटी, बँक ऑफ इंडिाला २०० प्रकरणात ८ हजार ०६९.१४ कोटी, कॅनेरा बँकेला २०८ प्रकरणात ७ हजार ५१९.३० कोटी, इंडियन ओव्हसीज बँकेला २०७ प्रकरणात ७ हजार २७५.४८ कोटी, अलाहाबाद बँकेला ८९६ प्रकरणात ६ हजार ९७३.९० कोटी तर युको बँकेला ११९ प्रकरणात ५ हजार ३८४.५३ कोटी रुपयांचा चुना लागला आहे.
बँक ऑफ महाराष्ट्राला ३ हजार ३९१ कोटींचा चुना
RBIने दिलेल्या माहितीनुसार एक एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० याकाळात ओरियंटल बँक ऑफ कॉमर्सची ३२९ प्रकरणात ५ हजार ३४०.८७ कोटींना, सिडिकेट बँकेची ४३८ प्रकरणात ४ हजार ९९९.०३ कोटींना, कॉर्पोरेशन बँकेची १२५ कोटी प्रकरणात ४,८१६.६० कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडियाची ९०० प्रकरणात ३ हजार ९९३.८२ कोटी, आंध्र बँकेची ११५ प्रकरणी ३ हजार ४६२.३२ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्रची ४१३ प्रकरणात ३ हजार ३९१.१३ कोटी, युनायडेट बँक ऑफ इंडियाची ८७ प्रकरणात २ हजार ६७९.७२ कोटी, इंडियन बँकेची २२५ प्रकरणात २ हजार २५४.११ कोटी आणि पंजाब आणि सिंध बँकेची ६७ प्रकरणात ३९७.२८ कोटींची फसवणुक झाली आहे. यासह अन्य बँक लुटल्या गेल्या आहेत

कोणत्याही टिप्पण्या नाहीत