दिल्ली: वेबटीम दिल्लीत ज्यूसच्या एका दुकानात ग्लास धुणाऱ्या या व्यक्तीला तुम्ही ओळखलंत का?... हे आहेत कारगिल युद्धातील वीर योद्धा सतवीर...
दिल्ली: वेबटीम
आज कारगिल युद्धाला २१ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने देश आज कारगिल विजय दिन साजरा करत शहिदांना नमन करत आहे. अशा परिस्थितीत कारगिल युद्धाच्या वेळी अत्यंत दुर्गम टोलोलिंग टेकडी जिंकणार्या २ राष्ट्रीय राजपुताना रायफल्सच्या तुकडीचा भाग असलेले माजी लान्स नायक सतवीर सिंह बाऊजी यांनी आपल्या पराक्रमाची कहाणी सांगितली. यावेळी, ते युद्धात जखमी झाले. आजही पाकिस्तानची गोळी त्यांच्या पायात आहे. त्यामुळे त्यांना काठीचा आधार घेतल्याशिवाय चालता येत नाही. जखमी झाल्यानंतर आणि नंतर सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर, जखमी सैनिकांकडे सरकार कसे दुर्लक्ष करते याचा पाढाच त्यांनी वाचला. सरकारच्या या बपर्वाईमुळे बाऊजी अत्यंत दु:खी झाले आहेत.
सरकार फक्त शहिदांच्या मंचावर फुले अर्पण करून देशातील जनतेची मने जिंकते, पण सैनिकांबद्दल मनात अजिबात कोणताही आदर नसतो, असे बाऊजी म्हणाले. त्यांनी यावेळी सांगितले, की आपल्याला कसा तब्बल १९ वर्षे पेन्शनसाठी त्यांना लढा द्यावा लागला.
माजी लान्स नायक सतवीर बाऊजी यांनी कारगिल युद्धाच्या २१ वर्षानंतर आपले दु:ख उघड केले. मी निवृत्त झाल्यानंतर १९ वर्षे मला पेन्शन मिळाली नाही. मी संसदेत आवाज उठवला, आंदोलन केले, निदर्शने केली आणि प्रश्न उपस्थित केला. तेव्हा मला कुठे मला पेन्शन मिळाली. संरक्षण मंत्र्यांशी पत्रांद्वारे बोलल्यानंतर १९ वर्षानंतर २०१९ मध्ये निवृत्तीवेतन सुरू झाले, अशी माहिती बाऊजी यांनी दिली.
जखमी सैनिकांकडे शासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे अत्यंत खिन्न झाले बाऊजी सांगत होते. युद्धात जखमी झालेले सैनिक जिवंत राहतात, मात्र त्यांना कोणतेही काम न उरल्यामुळे सरकार तर त्यांना रडवून रडवून मारते. त्यांचा उदरनिर्वाह चालावा यासाठी ना त्यांच्या मुलांना नोकरी दिली जाते, ना जखमी सैनिकांसाठी काही केले जाते. मुलांच्या गरजा पूर्ण होत नाहीत, त्यांना शाळेची फी भरणे देखील शक्य होत नाही. आशा परिस्थितीमुळे हे सैनिक नाराज असतात, असे बाऊजी यांनी सांगितले.
दिल्लीत ज्यूसच्या एका दुकानात ग्लास धुणाऱ्या या व्यक्तीला तुम्ही ओळखलंत का?... हे आहेत कारगिल युद्धातील वीर योद्धा सतवीर सिंह बाऊजी. सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे. देश कारगिल विजय दिवस साजरा करत असताना कारगिल युद्धातील हा हिरो ज्यूसच्या दुकानात उष्टी भांडी धूत बसला आहे.
आज कारगिल युद्धाला २१ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने देश आज कारगिल विजय दिन साजरा करत शहिदांना नमन करत आहे. अशा परिस्थितीत कारगिल युद्धाच्या वेळी अत्यंत दुर्गम टोलोलिंग टेकडी जिंकणार्या २ राष्ट्रीय राजपुताना रायफल्सच्या तुकडीचा भाग असलेले माजी लान्स नायक सतवीर सिंह बाऊजी यांनी आपल्या पराक्रमाची कहाणी सांगितली. यावेळी, ते युद्धात जखमी झाले. आजही पाकिस्तानची गोळी त्यांच्या पायात आहे. त्यामुळे त्यांना काठीचा आधार घेतल्याशिवाय चालता येत नाही. जखमी झाल्यानंतर आणि नंतर सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर, जखमी सैनिकांकडे सरकार कसे दुर्लक्ष करते याचा पाढाच त्यांनी वाचला. सरकारच्या या बपर्वाईमुळे बाऊजी अत्यंत दु:खी झाले आहेत.
सरकार फक्त शहिदांच्या मंचावर फुले अर्पण करून देशातील जनतेची मने जिंकते, पण सैनिकांबद्दल मनात अजिबात कोणताही आदर नसतो, असे बाऊजी म्हणाले. त्यांनी यावेळी सांगितले, की आपल्याला कसा तब्बल १९ वर्षे पेन्शनसाठी त्यांना लढा द्यावा लागला.
माजी लान्स नायक सतवीर बाऊजी यांनी कारगिल युद्धाच्या २१ वर्षानंतर आपले दु:ख उघड केले. मी निवृत्त झाल्यानंतर १९ वर्षे मला पेन्शन मिळाली नाही. मी संसदेत आवाज उठवला, आंदोलन केले, निदर्शने केली आणि प्रश्न उपस्थित केला. तेव्हा मला कुठे मला पेन्शन मिळाली. संरक्षण मंत्र्यांशी पत्रांद्वारे बोलल्यानंतर १९ वर्षानंतर २०१९ मध्ये निवृत्तीवेतन सुरू झाले, अशी माहिती बाऊजी यांनी दिली.
जखमी सैनिकांकडे शासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे अत्यंत खिन्न झाले बाऊजी सांगत होते. युद्धात जखमी झालेले सैनिक जिवंत राहतात, मात्र त्यांना कोणतेही काम न उरल्यामुळे सरकार तर त्यांना रडवून रडवून मारते. त्यांचा उदरनिर्वाह चालावा यासाठी ना त्यांच्या मुलांना नोकरी दिली जाते, ना जखमी सैनिकांसाठी काही केले जाते. मुलांच्या गरजा पूर्ण होत नाहीत, त्यांना शाळेची फी भरणे देखील शक्य होत नाही. आशा परिस्थितीमुळे हे सैनिक नाराज असतात, असे बाऊजी यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत