मुंबई : वेबटीम सध्या कोरोनाने देशभर थैमान घातले आहे, दररोज हजारो रुग्ण सापडत आहेत, त्यामुळे साहजिकच सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली आ...
मुंबई : वेबटीम
करोनाचे संकट घोंगावू लागताच मास्क आणि सॅनिटायझरची नफेखोरी सुरू झाली होती. ती रोखण्यात यश येत असतानाच करोना रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा काळाबाजार उघडकीस आला. या इंजेक्शनसाठी गरजूंची प्रचंड आर्थिक लूट करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा मुंबई गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने नुकताच पर्दाफाश केला होता. या प्रकरणी सात जणांच्या टोळीला अटक करण्यात आली होती व त्यांच्याकडून काळ्या बाजारात विक्रीसाठी साठा करून ठेवलेली १२ रेमडेसिवीर इंजेक्शन हस्तगत करण्यात आली. ५,४०० रुपये किमतीचे इंजेक्शन ही टोळी ३० हजार रुपयांना विकत होती. पोलीस व एफडीएच्या धडक कारवाईनंतरही औषधांचा काळाबाजार सुरूच आहे, हे उल्हासनगरमधील महिलेच्या अटकेवरून पुन्हा एकदा उघड झालं आहे.
सध्या कोरोनाने देशभर थैमान घातले आहे, दररोज हजारो रुग्ण सापडत आहेत, त्यामुळे साहजिकच सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. मात्र याचा बाजारात काहींनी फायदा उचलला आहे. मास्क, सॅनिटायझर व अन्य औषधाचा काळाबाजार सुरू आहे.नुकतीच 40 हजाराच्या कोरोना लसीची 60 हजारात विक्री करणाऱ्या एका महिलेस रंगेहाथ पकडले, त्यामुळे मोठी खळबळ उडाली असून यातून रुग्णांना फसविणार्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश होणार आहे.
नीता पंजवानी असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून ती सिपला कंपनीचे टोसीलीझुमॅब हे इंजेक्शन काळ्या बाजारात विकत होती. सुमारे ४०,५४५ रुपयाचे हे इंजेक्शन ती ६० हजार रुपयांना विकत असताना एफडीएच्या (FDA) अधिकाऱ्यांनी तिला रंगेहाथ पकडले. सहआयुक्त विराज पौणिकर, सहाय्यक आयुक्त प्रवीण पवार, व्हिजिलन्सचे सह आयुक्त सुनील भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली निशिगंधा पाष्टे, नितीन आहेर आणि संदीप नरावणे या औषध निरीक्षकांनी सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष नगर पोलीस उल्हासनगर पुढील तपास करीत आहे. चौकशीतून मोठ्या रॅकेटची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.
करोनाचे संकट घोंगावू लागताच मास्क आणि सॅनिटायझरची नफेखोरी सुरू झाली होती. ती रोखण्यात यश येत असतानाच करोना रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा काळाबाजार उघडकीस आला. या इंजेक्शनसाठी गरजूंची प्रचंड आर्थिक लूट करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा मुंबई गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने नुकताच पर्दाफाश केला होता. या प्रकरणी सात जणांच्या टोळीला अटक करण्यात आली होती व त्यांच्याकडून काळ्या बाजारात विक्रीसाठी साठा करून ठेवलेली १२ रेमडेसिवीर इंजेक्शन हस्तगत करण्यात आली. ५,४०० रुपये किमतीचे इंजेक्शन ही टोळी ३० हजार रुपयांना विकत होती. पोलीस व एफडीएच्या धडक कारवाईनंतरही औषधांचा काळाबाजार सुरूच आहे, हे उल्हासनगरमधील महिलेच्या अटकेवरून पुन्हा एकदा उघड झालं आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत