अच्छा खासा दोस्तभी दुष्मण बन जाता है..! मित्राच्या खुनाचा प्रयत्न.., वाचा काय आहे कारण ? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अच्छा खासा दोस्तभी दुष्मण बन जाता है..! मित्राच्या खुनाचा प्रयत्न.., वाचा काय आहे कारण ?

अहमदनगर : वेबटीम जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे, पार्टी करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने रागावलेल्या सात ते आठ मित्रांनी आपल्याचा ...

अहमदनगर : वेबटीम
जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे, पार्टी करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने रागावलेल्या सात ते आठ मित्रांनी आपल्याचा मित्राचा धारदार शस्त्राने व लाथाबुक्यांनी मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना नगर शहरातील टांगेगल्ली येथे रविवारी (दि.26) मध्यरात्री घडली आहे.   
              सागर साहेबराव खरमाळे (वय-30,रा. भुषणनगर, केडगाव) हा त्याच्या मित्रांसह कल्याण रोडवरील हॉटेल दिनेश जवळ गप्पा मारत उभा असताना तेथे स्वप्निल उर्फ सोन्या राजु दातरंगे (रा. नालेगाव), कुमार कचरे (रा. भुतकरवाडी), आप्पा बांगर (रा. हिवरेबाजार), राजु नेटके (रा. भुतकरवाडी), राहुल कोकणे (रा. जाधवमळा)(पुर्ण नाव माहित नाही), राजु रमय्या दास (रा.बोरूडेमळा) व त्यांचे अन्य दोन साथीदार यांनी खरमाळे यास पार्टी करण्यासाठी पैशांची मागणी केली.

यावर खरमाळे यांनी पार्टीसाठी पैसे देण्यास नकार दिला. यावर पार्टीसाठी तुच काय? तुझा बाप पण पैसे देईल, असे म्हणुन दमदाटी करून तेथुन निघुन गेले. त्यानंतर रात्री खरमाळे हे नालेगाव, टांगेगल्ली येथून जात असताना दातरंगे याच्यासह त्याच्या अन्य साथीदारांनी खरमाळे यांना रस्त्यात अडवुन पैसे न दिल्याच्या रागातुन धारदार शस्त्राने व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत