उंबरे : वेबटीम गावात दोन रुग्ण सापडले तरीही ग्रामपंचायत प्रशासनाला अद्याप जाग आली नसून तत्काळ गावात सर्वच ठिकाणी हायड्रोक्लोरीक औषध फवा...
उंबरे : वेबटीम
गावात दोन रुग्ण सापडले तरीही ग्रामपंचायत प्रशासनाला अद्याप जाग आली नसून तत्काळ गावात सर्वच ठिकाणी हायड्रोक्लोरीक औषध फवारणी करावी तसेच अन्य उपाययोजना राबवण्यात याव्यात, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांमधून केली जात आहे. दरम्यान, रुग्ण आढळल्यानंतर राबविण्यात येणाऱ्या उपाय योजनांचा ग्रामपंचायतीला पूर्णपणे विसर पडला आहे.
उंबरे गावात दोन दिवसांपूर्वी पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर ग्रामपंचायतीने तत्काळ उपाययोजना करण्याची गरज होती. मात्र केवळ हातावर हात ठेवून बसलेल्या प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली. गावात या कालावधीत औषध फवारणी करण्याचे तत्परता कुणीही दाखवली नाही. त्यानंतर आज पुन्हा कोरोनाबाधित दुसरा रुग्ण सापडला. त्यानंत्तरही ग्रामपंचायत प्रशासन अजुनही स्तब्ध आहे. त्यामुळे गावातून संताप व्यक्त केला जात आहे.
आज गावावर संकट आहे. अशावेळी ग्रामपंचायतीने नागरीकांच्या सुरक्षीततेसाठी तत्पर असायला हवे. गेल्या काही महिन्यांंपुर्वी ग्रामपंचायतीने औषध फवारणी केली असेलही मात्र आता रुग्ण सापडल्यानंतर त्यांच्या कुटूंबाच्या व ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी औषध फवारणी करावी. तसेच, यापुर्वीच अनेक ग्रामपंचायतींनी प्रतिकार शक्ती वाढीसाठी उपयुक्त अशा आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे प्रत्येक कुटूंबाला मोफत वाटप केले आहे. शेजारील वांबोरी, ब्राम्हणीतही अशा गोळ्यांचे वाटप झाले आहे. मात्र उंबरे ग्रामपंचायतीने अशाप्रकारे खर्च करण्याकडे टाळाटाळ केली आहे. तरी, उद्याच गावात औषध फवारणी करावी व प्रत्येक कुटूंबाला प्रतिकार शक्ती वाढविणार्या गोळ्यांचे वाटप करावे, अशी मागणी केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत