शेवगाव ः वेबटीम चापडगाव येथील अनिलकुमार चांडक यांचे ग्रामपंचायत गाळ्यातील कपड्याचे दुकान सुरू होते. येथे काही जणांनी तोंडाला मास्क ल...
शेवगाव ः वेबटीम
चापडगाव येथील अनिलकुमार चांडक यांचे ग्रामपंचायत गाळ्यातील कपड्याचे दुकान सुरू होते. येथे काही जणांनी तोंडाला मास्क लावला नसल्याचे आढळले. त्यामुळे त्यांच्या दुकानात ग्रामपंचायतचे कर्मचारी अशोक पातकळ हे गेले व त्यांनी दुकान चालू असल्याने दंडाची पावती फाडावी लागेल, असे सांगितले. त्यामुळे चांडक यांनी पातकळ यांना शिवीगाळ करीत त्यांच्या कानशिलात लगावली. तसेच त्यांच्या हातातील पावती पुस्तक फेकून दिले. या प्रकरणी अशोक पातकळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिलकुमार चांडक यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. करोना विषाणूचा संसर्ग पसरेल, याची जाणीव असतानाही तोंडाला मास्क न लावता दुकानात गर्दी केली. तसेच दंडात्मक कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण करून पावती पुस्तक फेकून दिले असल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत