घोडेगांव चौफुलीवर साडेसोळा किलो चंदनासह वाहन जप्त ; पाच लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज जप्त ! दोघांना अटक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

घोडेगांव चौफुलीवर साडेसोळा किलो चंदनासह वाहन जप्त ; पाच लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज जप्त ! दोघांना अटक

नेवासा : वेबटीम नगर - औरंगाबाद महामार्गावरील घोडेगांव चौफुलीवर गुप्त खबऱ्याच्या मिळालेल्या माहीतीच्या आधारे सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक...

नेवासा : वेबटीम
नगर - औरंगाबाद महामार्गावरील घोडेगांव चौफुलीवर गुप्त खबऱ्याच्या मिळालेल्या माहीतीच्या आधारे सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक जनार्दन सोनवणे यांच्या पथकाने राञीच्या गस्तीच्या वेळी सापळा लावून साडेसोळा किलो चंदन हस्तगत करुन एका झेनन गाडीसह पाच लाख ४१ हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात सोनई पोलिसांना यश आले असून दोन जण गजाआड केले आहे.
   याबाबत पोलिस सुञांकडून मिळालेली अधिक सविस्तर माहीती अशी,की चांदा येथून एका गाडीत चंदन येत असल्याची खबर गुप्त बातमीदाराकडुन सोनई पोलिसांना मिळाल्याने या  माहीतीच्या आधारे सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक जनार्दन सोनवणे,पोलिस नाईक किरण गायकवाड,पोलिस हवालदार सुधीर ढोले व होमगार्ड महानूर यांनी घोडेगांव चौफुलीवर सापळा लावुन शुक्रवार (दि१७) रोजी राञीच्या सुमारास सापळा लागून सुमारे  साडेसोळा किलो चंदन व एक टाटा कंपणीची माल वाहतूक गाडी (क्रमांक एम.एच १५ डि.के.४८३८) असा एकूण पाच लाख ४१ हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन या गुन्ह्यातील आरोपी पोपट जगन्नाथ पुंड व बाळू हरिभाऊ गायकवाड (दोघे रा.चांदा) तालूका नेवासा यांना ताब्यात घेवून पोलिस नाईक किरण दादू गायकवाड नेमणूक सोनई पोलिस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांना अटक करण्यात आली आहे.या घटनेचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय चव्हाण करत आहे.

चौकट
टाटा कंपणीच्या झेनन मालवाहतूक गाडीला गुप्त कप्पे करुन चंदनाची लाकडे दिसू नये म्हणून गाडीची मांडणी केलेली आसतांनाही सोनई पोलिसांनी मिळालेल्या माहीतीच्या आधारे चंदन चोराला गजाआड करुन मुद्देमाल हस्तगत केल्याने सोनई पोलिसांचे सर्वञ अभिनंदन केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत