न्यूयॉर्क: वेबटीम अमेरिकेत करोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. माणसांप्रमाणे प्राण्यांनाही करोनाची बाधा होत आहे. अमेरिकेत कोविड-१९ ची बाध...
न्यूयॉर्क: वेबटीम अमेरिकेत करोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. माणसांप्रमाणे प्राण्यांनाही करोनाची बाधा होत आहे. अमेरिकेत कोविड-१९ ची बाधा झालेल्या एका 'जर्मन शेपर्ड' श्वानाचा मृत्यू झाला आहे. करोनाची बाधा झालेल्या श्वानाचा हा पहिला मृत्यू आहे. या श्वानाला एप्रिल महिन्यात श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर काही आठवडे या श्वान करोनाबाधित होता.
स्टेम आयलँड येथील रॉबर्ट आणि एलिसन माहनी यांनी 'नॅशनल जिओग्राफी' वाहिनीला सांगितले की, एप्रिल महिन्यात श्वान 'बडी' हा आजारी पडला. त्यानंतर सातत्याने तो आजारीच होता. एका प्राण्यांच्या डॉक्टराने बडीची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्याला करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले. अमेरिकेच्या कृषी विभागाने जून महिन्यात एका 'जर्मन शेपर्ड' श्वानाला करोनाची बाधा झाली असल्याची माहिती दिली. हा पहिलाच करोनाबाधित रुग्ण होता. बडीची प्रकृती आणखी ढासळल्यानंतर अखेर त्याचा ११ जुलै रोजी मृत्यू झाला. बडीच्या रक्त चाचणीत लिम्फोमा (रोग प्रतिकारक शक्तींचा कर्करोग) झाला असल्याचेही आढळले. त्यामुळे त्याचा मृत्यू करोनामुळेच झाला की अन्य काही वैद्यकीय कारणांमुळे झाला, याची माहिती समोर आली नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत