राहुरी : वेबटीम राहुरी तालुक्यात 96 पैकी आतापर्यंत सुमारे 15 गावात कोरोनाने प्रवेश केला आहे, अर्थात यात काही रुग्ण बाहेरचे आहेत, तर का...
राहुरी : वेबटीम
राहुरी तालुक्यात 96 पैकी आतापर्यंत सुमारे 15 गावात कोरोनाने प्रवेश केला आहे, अर्थात यात काही रुग्ण बाहेरचे आहेत, तर काही बरे देखील झाले आहेत, मात्र कोरोनाची ही वाढती व हातपाय पसरविणारी आकडेवारी निश्चितच चिंताजनक आहे. दरम्यान, काल वांबोरीत खासगी डॉक्टर कोरोनाबाधित आढळल्यानंतर आज एक सामाजिक कार्यकर्ता बाधित असल्याचा अहवाल आल्याने मोठी खळबळ उडाली आहे, दरम्यान, संबंधित कार्यकर्ता 15 दिवसापासून नगर येथे असल्याचे समजते.राहुरी तालुक्यात आज अखेर एकुण ३८ रुग्ण सापडलं आहेत, यात केसापूर ४,पाथरे १,सोनगांव ३,वांबोरी २,तांदुळवाडी २, म्हैसगांव ३,वरवंडी ४,राहुरी फॅक्टरी ९, देवळाली(शेटेवाड़ी) १, कात्रड १, वळण १, राहुरी शहर ४, तमनर आखाडा १, गुहा १, तांदुळनेर १ आशा 15 ठिकाणी कोरोनाने शिरकाव केला आहे. वरीलपैकी ५ व्यक्ती (तमनरआखाडा १, सोनगांव २, वळण १, तांदुळनेर असे व्यक्ति तालुका बाहेरच रहीवासी असुन त्यांना बाहेरच संसर्ग झालेला असुन ते बाहेरच आहे परंतु त्यांचा मुळपत्ता राहुरी तालुका असल्यामुळे नोंदणी राहुरी तालुक्यात झाली आहे)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत