प्रशासक निवड ; राहुरीत महाविकास आघाडीची खाट कुरकुरणार ; भाजप बरोबरच शिवसेना, काँग्रेसचीही राष्ट्रवादीकडून शिकार ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्रशासक निवड ; राहुरीत महाविकास आघाडीची खाट कुरकुरणार ; भाजप बरोबरच शिवसेना, काँग्रेसचीही राष्ट्रवादीकडून शिकार !

एन. भोसले :-   राहुरी तालुक्यातील ऑगस्ट 2020 मध्ये मुदत संपणाऱ्या एकूण 45 ग्रामपंचायतीच्या निवडणूका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्य...


एन. भोसले :-  राहुरी तालुक्यातील ऑगस्ट 2020 मध्ये मुदत संपणाऱ्या एकूण 45 ग्रामपंचायतीच्या निवडणूका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने घेतला असून या ग्रामपंचायतींवर आता प्रशासक नेमला जाणार आहे. त्यासाठी पालक मंत्र्यानी स्थानिक आमदारांना सर्व अधिकार दिल्याने नकळत या प्रक्रियेतून मित्र पक्ष दुखावणार आहेत, त्यामुळे आता, राहुरीतही खाट कुरकुरण्याचा आवाज ऐकू येणार आहे अर्थात, जिल्ह्यात राष्ट्रवादी 6, काँग्रेस 2,  सेना ( गडाख) 1, भाजप 3  असे समीकरण असल्याने हा तिढा फकत राहुरीतच नाही, तर किमान  9 मतदार संघात पहायला मिळणार आहे. राहुरीत राज्यमंत्री  प्राजक्त तनपुरे हे आमदार आहेत, त्यामुळे येथील निवडीचे अधिकार त्यांना असल्याने तालुक्यांतील 45 ग्रामपंचायतीवर प्रशासकाच्या माध्यमातून नकळत राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे, सध्याच्या घडामोडीतुन कदाचित हे सरकार कोलमडले तरी आगामी निवडणुकीत हा फायदा फकत राष्ट्रवादीला होणार आहे, त्यामुळे मित्र पक्ष असलेले शिवसेना आणि काँग्रेसचे नेते कमालीचे अस्वस्थ झाले असून आता 45 प्रशासक निवडीत आपल्याला समान वाटा मिळावा, अशी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात प्रशासक निवडीतुन गल्लीतील मतभेद राज्याच्या राजकारणात चिघळतील, असा अंदाज आहे.
 
ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.   
 अ.नगर जिल्ह्यातील सुमारे 766 तर राहुरी तालुक्यातील 45 ग्रामपंचायतींवर आता प्रशासक नेमले जाणार आहे. प्रशासक नेमताना विस्तार अधिकारी पदाच्या व्यक्तीची नेमणूक केली जाते. परंतु ग्रामपंचायतींची संख्या जास्त असल्याने गावातील एका योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून निवड करण्याचा निर्णय झाला आहे, पालकमंत्री यांनी ते अधिकार स्थानिक आमदार यांना दिले आहेत, आमदारांची ज्याला शिफारस तो प्रशासक बनणार आहे, आशा प्रकारे राहुरीचे सर्व अधिकार हे नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांना मिळणार आहेत. त्यामुळे राहुरी तालुक्यातील अंबळनेर, आंबी, बाभूळगाव, चेडगाव, चिंचाळे, चिंचविहिरे, दवणगाव, गुहा, गुंजाळे, जांभळी, कनगर खुर्द, करजगाव, कात्रड, केंदळ बु., केसापूर, खडांबे बु., कोळेवाडी, कोपरे, कुक्कडवेढे, कुरणवाडी, लाख, माहेगाव, पाथरे खुर्द, पिंपळगाव फूनगी, पिंप्री अवघड, राहुरी खुर्द, रामपूर, संक्रापुर, सात्रळ, तांभेरे, तांदुळनेर, (तांदुळवाडी), तिळापूर, उंबरे, वडनेर, वळण, वांबोरी, वांजुळपोई, वरशिंदे, वरवंडी, वावरथ, बोधेगाव, धानोरे, गणेगाव, (वाघाचा आखाडा) आदी सुमारे 45 ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदासाठी अनेकांनी वाड्यावर फिल्डिंग लावली आहे, आपणच कसे निष्ठावान आहोत, याची शेखी मिरवली जात आहे, तर 'याने आपले काम केले, हा कर्डीले साहेबांकडे होता, तो आपला नाही', असे कानही भरवले जाऊ लागले आहेत. आशा पद्धतीने तांदुळवाडी, वाघ आखाडा सोडून  43-44 गावात राजकारण तापले आहे.  मात्र याचवेळी राहुरीत शिवसेनेचा मोठा गट आहे. जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांचा शिवसेना पक्ष सत्तेत आहे, नव्हे नव्हे तर मुख्यमंत्री सेनेचाचं आहे, उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वाढविण्याची जबाबदारी जिल्हा प्रमुखांवर दिली आहे, असे असताना राहुरीतील 44 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे प्रशासक नेमले तर सेनेच्या पदरात काय पडणार ? सेना कशी वाढणार? या चिंतेत शिवसैनिक भेदरले आहेत, त्यामुळे अनेकांनी रावसाहेब खेवरे यांच्याकडे नाना, आपल्याला  प्रशासक निवडीतही समान वाटा मिळावा, व आपले शिवसैनिकही काही ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून बसवावेत, अशी मागणी  सुरू झाली आहे, शिवाय सेनची ताकद वाढविण्यासाठी ही योग्य संधी असून ती सोडू नका, प्राजक्त दादा सेनेला 22 ग्रामपंचायत प्रशासकाच्या जागा देण्यासाठी कधीच आढेओढे घेणार नाहीत, असेही शिवसैनिक आत्मविश्वासाने बोलत आहेत, अशीच अवस्था काँग्रेसची आहे, त्यांचे कार्यकर्ते बोटावर मोजण्या इतपत आहेत, मात्र त्यांनाही सत्तेची ही फळे चाखायची आहेत, त्यातून गुहासह तालुक्याच्या पूर्व आणि दक्षिनेकडील काही कार्यकर्ते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना साकडे घालणार असल्याचे कानावर पडत आहेत. एकूणच, काय तर कुणी काहीही म्हणो, पण राज्यात सरकार अस्थिर आहे, अशावेळी गावागावात आपल्या पक्षाचे प्रशासक नेमून पक्ष मजबुतीकरणासाठी ही संधी चालून आलेली आहे,  चार-सहा महिन्यात कदाचित सरकार पडले तरी स्थानिक आमदारांना व संबंधित पक्षाला हे फायदेशीर आहे,त्याचा थेट परिणाम मतदानावर होणार आहे, त्यामुळे मित्र पक्षातील सेना व काँग्रेससह विरोधी भाजपाच्या नेत्यांनाही धडकी भरली आहे, यातून या आमदारांच्या अलिखित शिफारस नियमावर  टीका होईल किंवा प्रसंगी न्यायालयात हा मुद्दा जाऊ शकतो, असो, सध्यातरी राहुरीत राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस 44 ग्रामपंचायतीमध्ये सत्तेची कशी विभागणी करते, याकडे सर्वांच्या नजरा आहे.
  •  राहूरीत आगामी राजकारण करायचे असेल तर ग्रामपंचायत सत्ता महत्वाची असते, हे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांना माहिती आहे, त्यामुळे 44 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे लोक बसताना पाहून ते नक्कीच शांत बसणार नाहीत, याशिवाय खासदार सुजयदादा विखे यांच्याकडेही काही मोठ्या ग्रामपंचायती आहेत, त्यामुळे तेथे राष्ट्रवादीचे लोक बसली तर होणारे नुकसान त्यांनाही समजत आहे, त्यामुळे या निवडीला ते कसे ब्रेक लावतात, हे पाहणे गरजेचे आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत