माजी मुख्यमंत्री फडणवीसांचे बॅनर नको ; पक्षाने भरला कार्यकर्त्यांना दम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

माजी मुख्यमंत्री फडणवीसांचे बॅनर नको ; पक्षाने भरला कार्यकर्त्यांना दम

मुंबई ः वेबटीम    राज्यात सध्या कोरोनाने बिकट अवस्था केली आहे. येथील जनता हवालदिल झाली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचा...

मुंबई ः वेबटीम 
 
राज्यात सध्या कोरोनाने बिकट अवस्था केली आहे. येथील जनता हवालदिल झाली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसाचे कुठेही बॅनर प्रसिद्ध करू नये, जर कोणी बॅनर लावलेच तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असा दम पक्षातर्फे कार्यकर्त्यांना भरल्याने माजी मुख्यमंत्र्यासोबत फोटो झळकविण्यासाठी उत्साही असलेल्या असंख्य इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आहे.
     
भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उद्या वाढदिवस आहे. मात्र यंदा करोनाचं संकट असल्याने फडणवीस यांच्या वाढदिवशी बॅनरबाजी न करण्याचं आवाहन पक्षातर्फे करण्यात आलं आहे. तसेच कुणीही वाढदिवसानिमित्त बॅनर्स, होर्डिंग्ज लावल्यास गंभीर दखल घेतली जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
भाजपच्या प्रदेश कार्यालयातून एक पत्रक काढून भाजपच्या कार्यकर्त्यांना हे आवाहन करण्यात आलं आहे. उद्या २२ जुलै रोजी देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. मात्र, यंदा राज्यात करोनाचं गंभीर संकट असल्याने वाढदिवसानिमित्त कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन न करण्याचं आवाहन पक्षाने केलं आहे. फडणवीस यांच्या वाढदिवशी शुभेच्छा बॅनर्स, होर्डिंग्ज लावू नका. तसेच वर्तमानपत्रे तसेच टीव्हीवरही वाढदिवसाच्या जाहिराती दिल्या जाणार नाहीत. वाढदिवसाला कोणत्याही प्रकारे उत्सवी स्वरुप देण्याचा प्रयत्न होता कामा नये. तसं केल्यास पक्षाकडून त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारा देतानाच दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहनही करण्यात आलं आहे. तसेच करोनाचं संकट असल्याने राज्यातील नागरिकांना मदत करण्यासाठी पुढे येण्याचं आणि सेवाकार्यात योगदान देण्याचं आवाहनही करण्यालं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत