मुळा धरणात 40 टक्के पाणीसाठा ; वाचा किती आहे आवक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मुळा धरणात 40 टक्के पाणीसाठा ; वाचा किती आहे आवक

राहुरी ः वेबटीम  राहुरीसह नेवासा, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकर्‍यांचे लक्ष लागलेल्या मुळा धरणात आज सायंकाळी 1200 क्युसेकने आवक सु...

राहुरी ः वेबटीम 
राहुरीसह नेवासा, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकर्‍यांचे लक्ष लागलेल्या मुळा धरणात आज सायंकाळी 1200 क्युसेकने आवक सुरू होती तर धरणाने 10 हजार दलघफू पाणीसाठ्याचा टप्पा ओलांडला असल्याचे दिसून आले. दरम्यान, मुळा धरणाचा पाणीसाठा 40 टक्याच्या आसपास पोहचला आहे. 
नगर दक्षिण जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या मुळा धरणात अजुनही अपेक्षित आवक सुरू झालेली नाही. मात्र, धरण परिसरातील पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. आज सायंकाळी 6.30 वाजता मुळा धरणात 10 हजार 300 दलघफू पाणीसाठा झाला होता. तर आवक 1200 क्युसेकने सुरू होती. 
दरम्यान, आजपासून धरण पाणलोटात पावसाला काही प्रमाणात सुरूवात झाली असून येणार्‍या दोन तीन दिवसात अजून आवक वाढेल अशी अपेक्षा आहे. मात्र, सध्याच्या धरणातील पाणीसाठ्यावरून यंदाही धरण पूर्णक्षमतेने भरेल, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत