अहमदनगर ः वेबटीम मुदत संपणार्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती देताना नियम व निकष काय असावेत, यासाठी शासनाने परिपत्रक काढले अ...
अहमदनगर ः वेबटीम
मुदत संपणार्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती देताना नियम व निकष काय असावेत, यासाठी शासनाने परिपत्रक काढले असून त्या आधारावरच नियुक्ती दिली जाणार आहे.
या निकषात आता संबधित व्यक्ती हा त्या गावचा रहिवाशी असावा व त्याचे मतदार यादीत नाव असावे. तसच सरपंच व अन्य सदस्यांना प्रशासक म्हणून नियुक्त करता येणार नाही, प्रशासकास सरपंचांचे सर्व अधिकार प्राप्त होणार आहेत. सरपंचांचे मानधन व अन्य भत्ते हे प्रशासकाला मिळतील, ज्या दिवशी ग्रामपंचायत अस्तित्वात येईल, त्या दिवसापासून प्रशासकाचा कार्यकाळ संपुष्टात येईल.
दरम्यान, या निकषात शिक्षण , वय, गुणवत्ता याची कोणतीही अट नसल्याने आता मातब्बर मात्र, अंगठेबहाद्दर, अडाणी, ज्याला ग्रामपंचायतीचं काहीही मााहिती नाही, मात्र राजकीय वरदहस्त आहे, अशा राजकर्त्याला ही संधी सहज प्राप्त होणार आहे. त्यामुळे गावोगावी राजकीय वर्तूळातून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत