मुंबई ः वेबटीम पालघरमधील नालासोपाऱ्यातील महिलेच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील ३० वर्षीय दुकानदाराने महिलेची ह...
मुंबई ः वेबटीम
पालघरमधील नालासोपाऱ्यातील महिलेच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील ३० वर्षीय दुकानदाराने महिलेची हत्या केली आणि नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी या विकृताला अटक केली आहे. त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे.
मुंबईपासून जवळच असलेल्या पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे ही घटना घडली होती. ३२ वर्षीय महिला बाजारात खरेदीसाठी जायचं आहे असं सांगून घराबाहेर पडली होती. ती एका खेळण्यांच्या दुकानात गेली होती. तिथे कशावरून दुकानदाराशी बाचाबाची झाली. वाद वाढला आणि त्याचे पर्यावसन हत्येत झाले. दुकानदारानं महिलेला दुकानात नेऊन तिची हत्या केली. हत्येनंतर या विकृतानं बलात्कार केला. त्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून फेकून दिला.
घरातून खरेदीसाठी बाहेर पडली होती महिला...
ही महिला खरेदीसाठी घरातून बाहेर पडली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी परतली नाही. त्यानंतर तिच्या पतीनं शोधाशोध सुरू केली. परिसर पिंजून काढल्यानंतर अखेर त्यानं पोलीस ठाण्यात महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. दोन दिवसांनी २८ जून रोजी पोलिसांना चंदन नाका परिसरात एका प्लास्टिक बॅगममध्ये मृतदेह सापडला.
प्लास्टिक बॅगमध्ये सापडला मृतदेह
प्लास्टिक बॅगमध्ये मृतदेह आढळून आला. तिचा गळा चिरला होता. तक्रारदाराला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावण्यात आलं. मृतदेह पत्नीचा असल्याचं त्यानं सांगितलं. महिलेवर बलात्कार झाल्याचं शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट झालं, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं दिली. तुळिंज पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. घटनेचं गांभीर्य ओळखून क्राइम ब्रॅंचनेही तपास सुरू केला. त्यांचं पथक आरोपी दुकानदारापर्यंत पोहोचलं. त्याला अटक केली. विकृत आरोपीनं हत्येची कबुली दिली. महिलेची हत्या केल्यानंतर बलात्कार केला, असं त्यानं सांगितलं.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत