सोन्याचा भाव भिडला गगनाला ; वाचा किती झाला दर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सोन्याचा भाव भिडला गगनाला ; वाचा किती झाला दर

मुंबई ः वेबटीम  कोरोनाच्या काळातही देशभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे . मुंबईतही सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली. या...

मुंबई ः वेबटीम  कोरोनाच्या काळातही देशभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे . मुंबईतही सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली. यासह आता मुंबईत सोन्याचे दर 50 हजार पार गेले आहेत. जीएसटीसह मुंबईत प्रतितोळा सोनं 50,372 रुपये किंमत झाली आहे. तसेच चांदीचे दर प्रतिकिलो 52,400 रुपये इतके झाले आहेत.

मागील दोन आठवड्यापासून सोन्याच्या दरात विलक्षण वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही वाढ होत असल्याने यामागील कारणांचं देखील विश्लेषण होतंय. मात्र, वाढत्या सोन्याच्या किमतीमुळे सोनं सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे सराफा व्यवसायिकांचीही चिंता वाढली आहे.

दरम्यान, घरेलू सराफ बाजारात शुक्रवारी (10 जुलै) सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ होताना दिसली. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार नवी दिल्लीत शुक्रवारी प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 8 रुपयांची वाढ झाली. यासह दिल्लीतील सोन्याचे दर 49,959 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. सोन्याच्या दरातील ही वाढ आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतारांमुळे झाल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. याआधी मागील सत्रात गुरुवारी सोन्याचे दर 49,951 रुपये प्रति 10 ग्रॅम असताना बाजार बंद झाला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत