अहमदनगर : वेबटीम ‘ ‘प्लाझ्मा थेरपीचा वापर करून जिल्ह्यातील इतर करोना बाधितांवर उपचार करता येतील. त्यासाठी नगर जिल्ह्यामध्ये जे करोना प...
अहमदनगर : वेबटीम
‘ ‘प्लाझ्मा थेरपीचा वापर करून जिल्ह्यातील इतर करोना बाधितांवर उपचार करता येतील. त्यासाठी नगर जिल्ह्यामध्ये जे करोना पॉझिटिव्ह झाले होते, व जे त्यामधून बरे होऊन घरी परतले आहेत, त्यानी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे दरम्यान, कोरोना रुग्णासाठी प्लझ्मा ही संजीवनी ठरणार असून कोरोनातुन बरे झालेल्या व्यक्तीकडे हे औषध असणार आहे.
. जिल्ह्यात काल दिवसभरात २६१ करोना बाधित वाढले असून एकूण बाधितांच्या संख्येने चार हजारांचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ४ हजार १८५ झाली आहे. त्यापैकी एकूण २ हजार ७२१ रुग्ण हे करोनामुक्त झाले असून सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ४०४ आहे.
नगरमध्ये करोनाचा कहर सुरूच आहे. नगर महापालिका हद्दीसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आता वेगाने बाधितांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून तर दररोज तीन अंकी रुग्णसंख्या ही नगर जिल्ह्यामध्ये वाढू लागली आहे. त्यामुळे करोना बाधितांचा एकूण आकडा झपाट्याने वाढत आहे. आज तर करोना बाधितांचा आकडा चार हजारांच्या पुढे गेला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत करोनामुळे ६० जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या पाहता त्या तुलनेत मृत्यूचे हे प्रमाण जवळपास दीड टक्का एवढे आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत