राहुरी : वेबटीम भाजप व मित्र पक्षाचे सरकार असताना कांद्याला किमान 1 हजार ते 3 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाले होते, तरीही विरोधक त्यावेळी ओर...
राहुरी : वेबटीम

भाजप व मित्र पक्षाचे सरकार असताना कांद्याला किमान 1 हजार ते 3 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाले होते, तरीही विरोधक त्यावेळी ओरडत होते, आता विरोधक सत्तेत असताना कांद्याचे भाव 500 -600 रुपये कवडीमोल मिळत असताना हे ढोंगी गप्प का ? असा सवाल भाजपचे राहुरी तालुका उपाध्यक्ष ज्ञानदेव क्षीरसागर यांनी केला आहे. दरम्यान, कांदा सडत असताना सरकारने वेळीच हस्तक्षेप करून बाजारभाव न वाढविल्यास संतप्त बळीराजा सडक्या कांद्याच्या माळा या सरकारला घालील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
क्षीरसागर म्हणाले, महाराष्ट्र हे शेतकर्यांचे , कष्टकर्यांचे राज्य आहे. मात्र आज येथे शेतकरी सुखी नाही, मागील भाजप व मित्र पक्ष सत्तेत असताना कांद्याला भाव चांगले होते, सरकारचे त्यावर तसे नियंत्रण होते, त्यामुळेच सरासरी हजार रुपये कांद्याला भाव मिळत होता, मात्र तरीही विरोधक आरडा ओरडा करत होते, आता सत्तेत विरोधक आहेत, आजचे भाव पाहिल्यास एकेकाळी कांद्याच्या भावासाठी ओरडणारे हेच विरोधक आज मात्र कवडीमोल भाव निघत असताना गप्प आहे, त्यामुळे आजच्या सत्ताधाऱ्यांचे पुतना मावशीचे प्रेम उघड झाले आहे. सरकारने शेतकर्यांच्या भावनेशी न खेळता प्रति क्वीटल एक हजार रुपये भाव देण्यासाठी व्यापाऱ्यांवर बंधन घालावे, अन्यथा शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर येऊन त्याची मोठी किंमत सत्ताधारी लोकांना भोगावी लागेल, असा इशारा देखील क्षिरसागर यांनीं दिला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत