श्रीरामपूर : वेबटीम तालुक्यातील पढेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा मार्च २०२० या वर्षाचा दहावीचा न...
श्रीरामपूर : वेबटीम
तालुक्यातील पढेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा मार्च २०२० या वर्षाचा दहावीचा निकाल ९४.९५ टक्के लागला आहे. परिक्षेस बसलेल्या ११९ विद्यार्थ्यांपैकी ११३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विद्यालयातील ऋषिकेश ज्ञानेश्वर रामकुंवर या विद्यार्थ्यांने ९३.६० टक्के गुण मिळवून विद्यालयाचा प्रथम येण्याचा मान मिळवला असून सृष्टी उमेश बनकर ९२.०० टक्के द्वितीय, तर अर्थव कैलास बंगाळ ९१.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य रमेश वेताळ, पर्यवेक्षक सोमनाथ गायकवाड, शिक्षक आर.एच.धरम, डी.पी.चव्हाण, बी.आर.पटारे, एन.एस.कडू, गुलाब पटेल, राजेंद्र गायकवाड, सुधाकर बनकर, एन.एस. कडू, बी.सी. शेख यांचे मार्गदर्शन लाभले तर सरपंच कीर्ती लिप्टे, स्कूल कमिटीचे के.वाय.बनकर, अच्युतराव बनकर, आण्णासाहेब बनकर, अच्युतराव बनकर, बापूसाहेब काळे, माजी प्राचार्य शिवाजी लबडे यांनी कौतुक केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत