दोनच काय चार बायका सांभाळू शकतो ...! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

दोनच काय चार बायका सांभाळू शकतो ...!

अहमदनगर : वेबटीम    ज्या नवऱ्यामध्ये बायका सांभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो,' असं सडेतोड प्रत्युत्तर शिवसेने...

अहमदनगर : वेबटीम   
ज्या नवऱ्यामध्ये बायका सांभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो,' असं सडेतोड प्रत्युत्तर शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना दिलं आहे.
दूध दरासाठी भाजपनं आज पुकारलेल्या आंदोलनात माजी मंत्री व भाजपचे नेते प्रा. राम शिंदे यांनीही सहभाग घेतला होता. आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली होती. 'करोना महामारीच्या काळात शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना दिलासा देण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे. शेतकरी, दूध उत्पादक रस्त्यावर आले आहेत. विजेची बिलं अव्वाच्या सव्वा येताहेत. खतं मिळेनासी झाली आहेत. कांद्याचा भाव कमी झालाय. या सरकारला जनतेशी आणि शेतकऱ्यांशी काहीही घेणंदेणं नाही. 'एका नवरा आणि दोन बायका' अशी या सरकारची अवस्था आहे. या तिघाडीचा खेळ आता आवरत आला असून हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ताही लागणार नाही,' असं राम शिंदे म्हणाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत