पुणे : वेबटीम महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा नाविन्यपूर्ण अभिनव उपक्रम NE P राष्ट्रीय शैक्षणिक धोरण2020 या विषयावर राज्यभरातील शिक्षकांस...
पुणे : वेबटीम महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा नाविन्यपूर्ण अभिनव उपक्रम NE P राष्ट्रीय शैक्षणिक धोरण2020 या विषयावर राज्यभरातील शिक्षकांसाठी फेसबुक लाईव्ह
द्वारे 3 दिवसीय कार्यशाळा यशस्वी संपन्न झाली . 
आपल्या देशात 34 वर्षानंतर बदल
झालेल्या NE Pराष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत राज्यातील शिक्षकांना माहिती व्हावी
धोरणात नमूद असलेल्या महत्त्वपूर्ण बिंदूंची माहिती प्राप्त व्हावी राष्ट्रीय
शैक्षणिक धोरण 2020 त्याचे स्वरूप व्याप्ती प्रत्यक्ष अंमलबजावणी व नवीन आकृतिबंध
यासंदर्भात राज्यभर जाणीव जागृती होण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य शिक्षक
परिषद प्राथमिक विभागाच्या अधिकृत फेसबुक पेज ग्रुप वरून राज्याध्यक्ष श्री राजेश
सुर्वे यांच्या संकल्पनेतून संस्थापक आमदार संजय केळकर साहेब यांच्या अनमोल
सहकार्याने तीन दिवसीय फेसबुक लाईव्ह कार्यशाळेचे आयोजन नुकतेच दि 15ऑगस्ट ते 17
ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी 4ते5 या वेळेत करण्यात आले होते. राज्यातील हजारो
शिक्षकांनी कार्यशाळेत सहभाग नोंदवला असल्याची माहिती राज्याध्यक्ष राजेश सुर्वे
यांनी दिली आहे. तीन दिवसीय फेसबुक लाइव्ह कार्यशाळेत दिनांक 15 ऑगस्ट रोजी शिक्षण
तज्ञ प्राची साठी दिनांक 16 ऑगस्ट रोजी प्राध्यापक मंदार भानुशे दिनांक 17 ऑगस्ट
रोजी प्राध्यापक बालाजी चिरडे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील बाल शिक्षण
माध्यमिक उच्च माध्यमिक आकृतीबंध(5+3+3+4) बाबत अनमोल असे मार्गदर्शन केले नवीन
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशव्यापी असून मातृभाषेला प्राधान्य देणारे आहे
.संशोधनाला प्राधान्य देणारे आहे तसेच कौशल्याधिष्ठित शिक्षणावर भर देण्यात आलेला
आहे वेगवेगळ्या भाषा शिकण्याला प्राधान्य देण्यात आलेले आहे शिक्षकाच्या गुणात्मक
वाढीसाठी विशेष उपाय योजना करण्यात आल्या आहेत असून शिक्षण सेवक ही पद्धत बंद
करण्यात आल्याचे धोरणात नमूद आहे . सरकारी व खाजगी शाळांसाठी एकच नियमावली असल्याचे
धोरणात नमूद आहे बी एड अभ्यासक्रम चार वर्षांचा करण्यात आला असून तो सर्वांना
बंधनकारक राहणार आहे त्याची अंमलबजावणी 2030 पासून होणार असल्याचे धोरणात नमूद आहे
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे वंचित उपेक्षित घटकांना न्याय देणारे ठरणार आहे
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे एक मजबूत राष्ट्रनिर्मितीस राष्ट्रीय एकात्मतेस वाव
मिळणार आहे. आदीप्रकारचे मार्गदर्शन झालेल्या कार्यशाळेत प्रमुख वक्त्यांनी केले याशिक्षक परिषदेच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरील राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न
कार्यशाळेच्या आयोजनासाठी तांत्रिक सहकार्य श्री कृष्णकांत मलिक व श्री रविकिरण
पालवे यांचे लाभले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे संस्थापक
आमदार मा श्री संजय केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य अध्यक्ष श्री राजेश
सुर्वे, राज्यकार्यवाह सुधाकर म्हस्के कोषाध्यक्ष संजय पगार कार्याध्यक्ष मधुकर
उन्हाळे, बाबुराव पवार, सुनील पाटील,,संघटन मंत्री सुरेश दंडवते, राज्य संपर्क
प्रमुख रावसाहेब रोहोकले गुरूजी ,राज्य सहकार्यवाह प्रकाश चुनारकर पुरुषोत्तम काळे
राजेंद्र चौधरी शांताराम घुले , राज्य उपाध्यक्ष डॉ संतपाल सोवळे, प्रकाश
चतरकर,अविनाश तालापलीवार, संजय शेळके राज्यप्रसिद्धी प्रमुख रविकिरण पालवे
कार्यालयीन मंत्री भगवान घरत ,मराठवाडा विभागीय अध्यक्ष संतोष कोठाळे ,उपाध्यक्ष
विकास गवते भगवान जायभाये अजित केंद्रे अमरावती विभाग अध्यक्ष विलास बाबरे राजेंद्र
जायभाये मंच्छित्र गुरमे बाबुराव गाडेकर संजय निजापकर ,राजेंद्र नांद्रे, मंगेश
जैवाळ, सुनील केणे , , भरत मडके , प्रविण ठुबे , , महादेव चाटे, श्रीराम बोचरे,
डि.एम. पांडागळे दिलीप पाटील , विजय साळवे , विलास बोबडे , राजेंद्र शिंगाडे , रमेश
गोहील, आबा बच्छाव , अवधूत वानखेडे , निळकंठ गायकवाड ,प्रकाश गुरव ,प्रशांत वाघमारे
, , ,कृष्णकांत मलिक ,संजय शेळके,प्रवीण ठुबे उमेश पाटील, शैलेश चौकशे , ,भिका
सपकाळे,प्रशांत वाघमारे,राजेंद्र शिंगाडे यांनी कार्यशाळे च्या यशस्वी आयोजनासाठी
परिश्रम घेतले असल्याची माहिती राज्य प्रसिद्धीप्रमुख रविकिरण पालवे दिलेल्या
प्रसिद्धी पत्रकांन्वये दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत