यंदा मलाच निवडून द्या : नाना निवडणूक लढविण्याच्या तयारीत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

यंदा मलाच निवडून द्या : नाना निवडणूक लढविण्याच्या तयारीत

 उंबरे : वेबटीम      आपल्याला राजकारण अजिबात आवडत नाही भो, आपल्यासारख्या लोकांचे ते कामं पण नाही, पण मी काय म्हणतो, आतापर्यंत आम्ही साऱ्या ग...

 उंबरे : वेबटीम


   
 आपल्याला राजकारण अजिबात आवडत नाही भो, आपल्यासारख्या लोकांचे ते कामं पण नाही, पण मी काय म्हणतो, आतापर्यंत आम्ही साऱ्या गावाला मतं दिली, एक वेळ मला आता गावाने मत द्यावे, मला पाच नंबर वॉर्डातून उभे रहा म्हणून जनता आग्रह धरत आहे, त्यामुळे तुम्ही एवढ्या वेळेला माझ्या मागे उभे रहा, अशी विनंती युवाकार्यक्रत्ये नानासाहेब दाभाडे यांनी केली आहे.

दाभाडे म्हणाले, मी सर्व सामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे, ग्रामपंचायतीच्या कारभाराच थोडंफार मला पण कळतंय, त्यामुळे मी काय म्हणतोय, आता यावेळेला मलाच निवडून द्या, तस पाहिले तर आमचे पाच पन्नास मते आता पाच नंबर वार्डात आली आहेत, त्याच्यामुले मला संधी आहे,  आणि मी सामान्य उमेदवार असल्याने माझ्याकडून एखादा चांगला उमेदवार पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे अपमान आणि उगाच पैसे खर्च करण्यापेक्षा बीनविरोध देऊन टाका, मी गावात विकास करतो, असे आवाहन दाभाडे यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत