कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव हद्दीत असलेला येवला नगरपालिकेचा पाणी साठवण तलाव कायमस्वरूपी कोपरगाव नागरपलीकेच्या ताब्यात द्यावा असे निवेदन कोपर...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव हद्दीत असलेला येवला नगरपालिकेचा पाणी साठवण तलाव कायमस्वरूपी कोपरगाव नागरपलीकेच्या ताब्यात द्यावा असे निवेदन कोपरगाव मनसेच्या वतीने ना.छगन भुजबळ यांना दिले.
या निवेदनाद्वारे ना. भुजबळ यांना कोपरगाव शहराच्या पिण्याचा पाण्याविषयी सविस्तर निवेदन दिले. कोपरगाव शहरात नेहमीच पिण्याचा पाण्याची टंचाई असते. कोपरगाव नागरपालिकेकडे पाणी साठवणुकीसाठी जास्त तलाव नसल्याने वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरविणे शक्य नाहीय.यामुळे कोपरगाव शहराला या उन्हाळ्यात २२ दिवसाआड पाणी मिळाले तर ते आता पाच दिवसांवर येऊन ठेपले आहे. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आ आशुतोष काळे यांनी प्रयत्न करत कोपरगाव शहर वासीयांसाठी महत्वाचा असलेला पाच नंबर साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्याचे खोदाइचे काम सुरू आहे. परंतु येणाऱ्या काही वर्षात वाढत्या लोकसंख्येचा विचार करता तो साठवण तलाव देखील कमी पडू शकतो.
त्यामुळे कोपरगाव तालुका हद्दीत येसगाव या ठिकाणी असलेला येवला नगरपालिकेचे पाणी साठवण तलाव कायमस्वरूपी कोपरगाव नगरपालिकेला हस्तांतरित करावा जेणेकरून येणाऱ्या काही वर्षात कोपरगाव शहरावर उभे ठाकलेले पाणी संकट दूर होण्यास मदत होईल. असे निवेदन कोपरगाव मनसेच्या वतीने संतोष गंगवाल, अनिल गायकवाड ,योगेश गंगवाल, सुनील फंड यांच्यावतीने ना. भुजबळ यांना दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत