कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहरातील गवारेनगर भागातील भौतिक सुविधा करून मिळाव्या अशा आशयाचे निवेदन कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव शहरातील गवारेनगर भागातील भौतिक सुविधा करून मिळाव्या अशा आशयाचे निवेदन कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना दिले.
निवेदन देते वेळी शहराध्यक्ष सुनील गंगुले, कार्याध्यक्ष संदीप कपिले,अमित बतरा,सादिक खान,अन्वर खाज पठाण,राजीक शेख,मुनूस, पोपट कटाळे आदी उपस्थित होते.
या निवेदनाद्वारे कोपरगाव शहर राष्ट्रवादी पक्षाने शहरातील गवारे नगर भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यातून जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकांना वाहन चालविताना खूप कसरत करावी लागत आहे.
त्यामुळे या रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करून मिळावे,तसेच या भागातील स्ट्रीट लाईट भूमिगत गटार व पिण्याचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा असे निवेदन कोपरगाव नगरपालिला शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत