जामखेड(अविनाश बोधले) दारु पिण्यासाठी घेऊन गेलेल्या मित्रालाच दुसर्या मित्राने इतर साथीदारांच्या मदतीने लुटल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्य...
जामखेड(अविनाश बोधले)
दारु पिण्यासाठी घेऊन गेलेल्या मित्रालाच दुसर्या मित्राने इतर साथीदारांच्या मदतीने लुटल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील खर्डा या ठिकाणी घडला. घटनेत गंभीर जखमी झालेल्या मित्राने दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला त्याच्या मित्रासह अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनकडून मिळालेली माहिती अशी की , जामखेड तालुक्यातील खर्डा येथील फीर्यादी सुभाष अर्जुन गोलेकर वय ५० वर्षे हा दि २२ रोजी गोलेकर वस्ती वरुन खर्डा गावात कामा निमित्त आला होता. या वेळी आरोपी भगवान निवृत्ती जोरे हा त्याचा मित्र भेटला व त्याने फीर्यादीस दारु पिण्यासाठी येण्याचा अग्रह धरला. त्यामुळे फीर्यादी व आरोपी हे दोघे मित्र मोटारसायकल वरुन खर्डा ते भुम रोडवरील एका धाब्याच्या पाठीमागील पटांगणात दारु पिण्यासाठी बसले. यानंतर आरोपी याने बाजुला जाऊन कोणाला तरी अज्ञात इसमास फोन करुन त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्या ठीकाणी आलेल्या अज्ञात इसमाने हातातील कसल्या तरी टनक वस्तूने फिर्यादी सुभाष गोलेकर याच्या डोक्यावर मारहाण केली व गंभीर जखमी केले. यानंतर आरोपी आसलेला त्याचा मित्र भगवान निवृत्ती जोरे याने त्याच्या छातीवर बसुन फिर्यादीची ८० हजार रुपयांची सोन्याची चैन हिसकावून घटनास्थळाहुन पळ काढला. फिर्यादी हा गंभीर जखमी झाल्याने दुसर्या दिवशी शुध्दीवर आल्यावर सर्व प्रकार पोलीसांना सांगितला.
त्यानुसार पोलिस पथकातील पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा, पो हे कॉ, नवनाथ भिताडे, मनोज साखरे, संजय लाटे साई मस्के, बाजीराव सानप, यांच्या पथकाने आरोपी भगवान जोरे यास तातडीने ताब्यात घेतले असुन दोघा जणांन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी आरोपी भगवान जोरे यास अटक केली असुन पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा हे करत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत