कोपरगाव(वेबटीम) कोपरगावातील शिंगणापूर भागातील राहुल पवार, पवन आढाव व अमोल खर्डे या तीन युवकांचे भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल कोपरगाव शह...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगावातील शिंगणापूर भागातील राहुल पवार, पवन आढाव व अमोल खर्डे या तीन युवकांचे भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले की शिंगणापूर भागातील हे तीन युवक नेहमी शिवजयंतीनिमित्त शिवनेरी येथे शिवज्योत आणायला जायचे त्यामुळे छत्रपती शिवरायांनी त्यांना आशीर्वाद रुपी भारत मातीची सेवा करण्याची संधी दिली आणि हे युवक त्या संधीचे सोने करतील असा विश्वास आहे.
शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल त्यांनी तिन्ही युवकांना कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदन केले.
सूत्रसंचालन एस टी कामगार सेनेचे शहरप्रमुख भरत मोरे यांनी केले तर आभार शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी मानले.यावेळी विधानसभा संघटक अस्लम शेख,वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,तालुकाप्रमुख पप्पू पेखळे ,उपतालुकाप्रमुख अविनाश धोक्रट, अविनाश वाघ, सुनिल बोराडे,किरण गिते,ऋषिकेश आजगे,आकाश लगड,अक्षय आढाव, अविनाश कोल्हे,उपशहरप्रमुख गगन हाडा,विशाल झावरे,संघटक बाळासाहेब साळुंके,नरेश बैरागी आदी शिवसैनिक उपस्थित होते




कोणत्याही टिप्पण्या नाहीत