राहूरी(प्रतिनिधी) दुपारची वेळ ,संगीताचे मधुर स्वर,मनमोहक रांगोळी,आप्तजनांचा सहवास अशा सुमधुर वातावरणात गेल्या २६ वर्षापुर्वी एकत्र शिकलेल्...
राहूरी(प्रतिनिधी)
दुपारची वेळ ,संगीताचे मधुर स्वर,मनमोहक रांगोळी,आप्तजनांचा सहवास अशा सुमधुर वातावरणात गेल्या २६ वर्षापुर्वी एकत्र शिकलेल्या मित्रांची गप्पांची मैफील राहुरी विद्यापिठाच्या सानिध्यात रविवारी रंगली.
सन १९९४ साली लोणी येथील आपले डेअरी डिप्लोमाचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर कामानिमीत्त एकमेकाला भेटु न शकलेले व अनेक
दिवसापासुन नोकरी व्यावसायानिमीत्त बाहेरगावी राहणा-या मित्रमंडळीचा स्नेहमेळा राहुरी येथे कृषी विद्यापिठाच्या सानिध्यात आजपर्यंतच्या जिवनातील एकमेकाचे अनुभव सांगत संपन्न झाला. अनेक दिवसा पासुन एकमेकांना भेटलेही नाही पण या स्नेहमेळाव्याच्या निमीत्ताने २०-२५ वर्षानंतर भेटल्यानंतर शालेय आठवणी जाग्या झाल्या.
त्यावेळेचे वातावरण,निसर्ग, शिक्षक,वडीलधारी मंडळी,कौटुंबीक प्रश्न आदि सर्वांची सरमिसळ होऊन गप्पांचे फड रंगले.अनेकामध्ये वयामानाने झालेल्या बदलामुळे ओळखण्यासही अडचण आली मात्र एखादा कॅालेजचा किस्सा सांगताच संपर्ण चित्रच डोळ्यासमोर उभे रहायचे.अनेक वर्षानंतर आपली माणसे भेटल्याचा आनंद डोळ्यातुन ओसंडुन वाहत होता. यावेळी वड़ीलधा-यांना विसरु नका.गावकडील अनुभव माणसाला मोठे करतात,सकारात्मक दृष्टीकोन ठेवा,कामात प्रामाणीकपणा हवा,अडचण आल्यास संपर्कात रहा.दरवर्षी वर्षातुन एकदा भेटण्याचा निर्णय घेउनचा कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी ज्ञानेश्वर दरंदले,
अनिल लांडगे, सिध्दार्थ साळवे,मधुकर भांड, अरुण गव्हाणे, नितीन बनकर, बजरंग नाटके,संतोष विखे, सादिक सय्यद, मनोज पाडवी, जालिंदर देशमुख यांचेसह वर्गमित्र उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत