राहूरी(वेबटीम) प्रसाद शुगर कारखान्याकडे गेल्या वर्षीच्या शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट न दिल्याने शेतकऱ्यांसह शेतकरी संघटना आक्रमक होऊन राज्य...
राहूरी(वेबटीम)
प्रसाद शुगर कारखान्याकडे गेल्या वर्षीच्या शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट न दिल्याने शेतकऱ्यांसह शेतकरी संघटना आक्रमक होऊन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे लुटायला निघाले की काय? असा सवाल शेतकऱ्यांनी करून उसाचे पेमेंट न दिल्यास कुटुंबासह कारखान्याच्या प्रवेशद्वारा दिवशी साजरा करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असून तनपुरेंनी सहकार मोडीत काढून खासगी कारखाना शेतकऱ्यांना लुटण्यासाठी काढला आहे का? असा सवाल शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पटारे यांनी उपस्थित केला आहे.
शेतकऱ्यांच्या थकीत रकमेच्या मागणीसाठी आज दिनांक १२ नोव्हेंबर रोजी शेतकरी संघटनेच्यावतीने राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रसाद शुगर कारखान्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आमचे पैसे दिल्याशिवाय येथून हटणार नाही, बायका मुलांसमवेत लुटारू राज्यमंत्र्याचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी करून आंदोलकांनी हा परिसर दणाणून सोडला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत