उंबरे ः वेबटीम उंबरेत राजकीय वातावरण तापत असतानाच आज सकाळी हनुमान मंदीर परिसरात प्रभाग क्रमांक पाचमध्ये एका उमेदवाराने दंड थोपटून समोर उ...
उंबरे ः वेबटीम
उंबरेत राजकीय वातावरण तापत असतानाच आज सकाळी हनुमान मंदीर परिसरात प्रभाग क्रमांक पाचमध्ये एका उमेदवाराने दंड थोपटून समोर उभे राहून दाखवा, असे जाहीर आव्हान दिले. त्यावर समोरच्यानेही यंदा 12 लाखाचे कांदे विकले आहेत, जिथं उजेडनं तिथं., आम्ही तयार आहोत, अशा शब्दात जोरदार कलगीतुरा रंगल्याने प्रभाग पाचमध्ये आतापासूनच प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
याचे झाले असे की, दररोजच्या प्रमाणेच सकाळी हनुमान दर्शन झाल्यानंतर अनेक पक्षाचे कार्यकर्ते या परिसरात कोवळे ऊन घेत गप्पा मारत असतात. काल सकाळी दोन विरोधी पक्षाचे उमेदवार समोर आले. तसं दोन्ही उमेदवार हे बाहेरच्या वार्डातील असले तरी त्यांची प्रभाग क्रमांक पाचमध्ये मोर्चेबांधणी सुरूच आहे. विशेष म्हणजे हे दोघांंनाही माहिती आहे. दरम्यान, काल विजयाचा विश्वास असलेल्या एका उमेदवाराने मी .....या घराण्याला जाहीर आव्हान देतो, हिम्मत असेल तर पाचमध्ये समोर उभे रहा, असे चॅलेन्ज दिले. तर गप्प बसेल तो विरोधक कसला.. याप्रमाणे समोरच्यानेही लगेच यंदा 12 लाखाचे कांदे विकले आहे, अजुन त्यात पैसे घालू आणि पाचमध्ये लढू अशा शब्दात हे चॅलेन्ज स्वीकारले.
दरम्यान, दोन्ही उमेदवारांनी 35-35 लाख रुपये उडवायची तयारी दर्शवल्याने तेथे उपस्थित असलेल्या लोकांनीही तोंडात बोट घातले. अखेर दोन्ही उमेदवारांनी पुन्हा एकमेकांशी हस्तांदोलन करत चला, माळवदेच्या टपरीवर चहा घेवू, असे म्हणून तेथून प्रस्थान केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत