कोपरगाव(प्रतिनिधी) कोपरगाव नगरपरिषद क्षेत्रातील बँकांनी पथविक्रेते यांना कर्ज वितरीत करून "पथविक्रेता दिवस" अंमलबजावणी करण्याचे ...
कोपरगाव(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद क्षेत्रातील बँकांनी पथविक्रेते यांना कर्ज वितरीत करून "पथविक्रेता दिवस" अंमलबजावणी करण्याचे आवाहन कोपरगाव नगरपालिकेने केले आहे.
पीएम स्वनिधी योजनेंतर्गत शासनाने पथविक्रेत्यांचे कर्ज मंजूर व वितरण करणेसाठी बँकांनी "पथविक्रेता दिवस" साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या अनुषंगाने कोपरगाव शहरातील सर्व शासकीय बँकांनी शनिवार दिनांक १९ डिसेंबर २०२० रोजी "पथविक्रेता दिवस" म्हणून साजरा करून कर्जा साठी आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणा-या पथविक्रेते यांना कर्ज वितरीत करावे.
पीएम स्वनिधी पोर्टल द्वारे पथविक्रेत्यांनी ऑनलाईन कर्जासाठी ज्या बँकेत अर्ज सादर केले आहे त्या बँकेच्या कार्यालयीन वेळेत आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह (आधार कार्ड, बँक पासबुक, LoR ऑनलाईन अर्जाला जोडला आहे याची खात्री करावी.) बँक शाखेत जावे. आज अखेर कोपरगाव कार्याक्षेत्रातील एकूण ६४५ पथविक्रेत्यांनी ऑनलाईन कर्जाचे अर्ज भरून बँकांकडे पाठविण्यात आलेले आहे. त्यापैकी ४०५ पथविक्रेत्यांचे बँकेकडून कर्ज मंजूर झाले असून ३७३ पथविक्रेते यांना कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे.
ज्या पथविक्रेत्यांचे कर्ज मंजूर झाले असून वितरण होण्याचे बाकी आहे असे सर्व पथविक्रेते यांनी कागदपत्रे घेवून शनिवार दिनांक १९ डिसेंबर २०२० रोजी संबधित बँकेत हजर राहावे. शहरातील सर्व बँकांनी पोर्टल वरील अर्जांवर कार्यवाहीसह मंजुरी व वितरण करून त्याची माहिती पोर्टलवर अद्यावत करावी.
शासनाच्या मागर्दर्शक सूचना नुसार "पथविक्रेता दिवस" साजरा करून बँकांनी मंजूर लाभार्थींना कर्ज वितरीत करावे. तसेच ज्या पथविक्रेत्यांना UPI ID/ QR Code वापरण्याबाबत काही अडचणी असेल तर कर्ज वितरीत केलेल्या बँकेत संपर्क साधावा. तसेच पथविक्रते यांना काही तांत्रिक अडचणी आल्यास त्यांनी नगरपरिषद कार्यालयातील संबंधित विभागाकडे संपर्क साधावा असे आवाहन नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, जिल्हा अग्रणी बँक मॅनेजर संदीप वालवलकर (सेंट्रल बँक ऑफ इंडिया) व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत