कामाची आवड असणाऱ्या तरुणांना संधी मिळायला पाहिजे म्हणून घेतला 'हा' निर्णय : माऊली क्षीरसागर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कामाची आवड असणाऱ्या तरुणांना संधी मिळायला पाहिजे म्हणून घेतला 'हा' निर्णय : माऊली क्षीरसागर

 उंबरे : वेबटीम        ग्रामपंचायत निवडणूक फकत हौस म्हणून किंवा पद मिळावे म्हणून लढायची नसती. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यामुळे गावच्या व...

 उंबरे : वेबटीम     


  ग्रामपंचायत निवडणूक फकत हौस म्हणून किंवा पद मिळावे म्हणून लढायची नसती. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यामुळे गावच्या विकासात काम करण्यासाठी वेळ व आवड असलेल्या व्यक्तीला संधी देण्यासाठी स्वतःच्या मुलाचा अर्ज मागे घेत गणेश ढोकणे या तडफदार तरुणाला उमेदवारी देणाऱ्या ज्ञानदेव क्षीरसागर यांच्या या मोठेपणाचे मोठे कौतुक सुरू आहे, एवढेच नव्हे तर गणेश याच्या विजयाची जबाबदारी त्यांनी स्वतः घेतल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे.   

माऊली क्षीरसागर यांना गावच्या विकासाची मोठी तळमळ आहे, यापूर्वीही अनेकदा त्यांनी गावच्या विकासासाठी अनेक प्रकारे हातभार लावला आहे. गावातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे, त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.  त्यांनी ग्रामपचायत निवडणुकीत मुलगा सिद्धार्थ क्षीरसागर याचा प्रभाग 4 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला होता, क्षिरसागर यांचे कार्य पाहून त्यांना मंडळाचे नेते साहेबराव दुशिंग यांनी उमेदवारीही दिली होती. मात्र,    आज सर्वात नवे, काम करण्याची आवड असलेले व गोरगरीब कुटुंबातील चेहरे गणराज मंडळात आहेत, हे पाहून माऊलींनी मोठा निर्णय घेण्याचे ठरवले.  या प्रभागात गणेश ढोकणे या तरुणाचा अर्ज होता, गणेश हा तळमळीचा कार्यकर्ता, पॅनल बनवताना त्याने कागदांची केलेली  जुळवाजुळव, त्याची सुरू असलेली धडपड आणि गेल्या पाच वर्षांपूर्वी अपक्ष लढवून देखील त्याने घेतलेली 87 मते, हा सर्व अभ्यास करून माऊलीं क्षीरसागर यांनी आपल्या मुलाला उमेदवारी घेतली तर गणेशाचा हिरमोड होईल, त्यापेक्षा ज्याला काम करण्याची इच्छा आहे, आशा तरुणांना संधी दिल्यास ते उलट चांगले काम करतील, त्यांना जेष्ठ या नात्याने आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून माऊली क्षीरसागर यांनी मनाचा मोठेपणा दाखवत आपला मुलगा सिद्धार्थ याचा अर्ज मागे घेत गणेशला उमेदवारी मिळवून दिली. आता गणेशच्या विजयाची जबाबदारी देखील त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली असून, गावातील सर्वच्या सर्व पाच प्रभागात विजय मिळविण्यासाठी माऊली स्वतः मतदारांना आवाहन करत आहेत.  माउलींनी दाखवलेला मोठेपणा आज सर्व जेष्ठ लोकांनी दाखवला तरच काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांना निवडणुकीत संधी मिळू शकते, अन्यथा सतरंज्या उचलण्याची जबाबदारी सोडून अन्य काहीही पदरात पडणार नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत