रस्तालूट व दरोडे प्रकरणातील आरोपी जेरबंद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

रस्तालूट व दरोडे प्रकरणातील आरोपी जेरबंद

राहुरी/गोविंद फुणगे  राहुरी तालुक्यासह विविध जिल्ह्यात दरोडे टाकुन चोरी गेलेल्या मोटारसायकली गाडी मालकला परत करण्यासाठी  आर्थिक व्यवहारात मध...

राहुरी/गोविंद फुणगे 

राहुरी तालुक्यासह विविध जिल्ह्यात दरोडे टाकुन चोरी गेलेल्या मोटारसायकली गाडी मालकला परत करण्यासाठी  आर्थिक व्यवहारात मध्यंस्ती करणारा राहुरी शहरातील अट्टल गुन्हेगार विशाल शेटे याच्या अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळुन गजाआड केलेय त्यांच्या कडुन अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस सुञांकडून वर्तवली जात आहे.

       विशाल उर्फ गणेश बाळासाहेब शेटे राहणार खळवाडी नाका नंबर ५ राहुरी अस या आरोपीचे नाव असुन  याने अहमदनगर जिल्ह्यासह औरंगाबाद,पुणे या जिल्ह्यांमधे काही वर्षांपासून दरोडे,रस्तालुट तसेच मोटारसायकल चोरीचा धुमाकूळ घातला आहे.गेल्या अनेक महिण्यापासुन तो पोलिसांच्या रडारवर होता.अनेक ठिकाणी तो पोलिसांना चकमा देत होता पोलिस त्याचा शोध घेत होते.

आज दिनांक 6 जानेवारी रोजी अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संदिप घोडके,दिपक शिंदे ,लक्ष्मण खोकले,रनजित जाधव,जालिंदर माने यांच्या पथकाने राहता तालुक्यातील ममदापुर राजुरी परीसरात सापळा लावुन विशाल शेटे यांच्या मुसक्या आवळत गजाआड केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत