कोपरगाव प्रतिनिधी शहरातुन जड वाहतुक व शहरातील रस्त्यांची दुरावस्था होवु नये यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सर्व पक्षिय बैठक बोलाविली ...
कोपरगाव प्रतिनिधी
शहरातुन जड वाहतुक व शहरातील रस्त्यांची दुरावस्था होवु नये यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सर्व पक्षिय बैठक बोलाविली होती.या बैठकीला सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.यासंदर्भात अधिक माहिती अशी की,नुकताच अधिकृत वाळूचा लिलाव झाला आहे.यासंदर्भात शहरातून वाहतूक होवु नये आणि रस्त्यांची दुरावस्था होवु नये म्हणून नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी बैठक बोलाविली होती. यात अनेकांनी आपले मत मांडले आहे.तर काहीनी हि वाहतूक शहराच्या बाहेरून करावी अशा सुचना देखील केल्या आहे.
यावेळी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे म्हणाले की,आलेल्या सर्व सुचना नुसार वाळूचा लिलाव अधिकृत झाला असुन वाळूचे डंपर शहरातून जातीलच परंतु त्याचा वेग कमी असला पाहिजे.रस्त्यांची दुरावस्था होवु नये यासाठी तहसीलदार.,मुख्याधिकारी आमदार साहेबांशी चर्चा करावी अशा सुचना देखील आल्या आहे.
पुढे ते म्हणाले की,यापूर्वी मी इंदिरापथ या ठिकाणी डंपर मी स्वतः अडविले त्यावेळेस कोणीच साथ दिली नाही.त्यामुळे तुम्ही सर्व मिळून निर्णय घ्या असे सर्वाना मी आवाहन केले या आवाहानाला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.त्यांनी दिलेल्या सुचना नुसार संबधित अधिकारी राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात ,संबधित ठेकेदार यांच्याशी चर्चा करुन रस्त्यांची दुर्दशा होणार नाही याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे असे ते म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत