प्रयास फाउंडेशनच्यावतीने वृद्धाश्रमातील माता-पित्यांना आधार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्रयास फाउंडेशनच्यावतीने वृद्धाश्रमातील माता-पित्यांना आधार

  देवळाली प्रवरा लॉकडाऊन पडला आणि ग्रुप एकत्र आला आणि आपणही समाजातील अशाच काही लोकांसाठी संवेदना जपल्या पाहिजेत आणि त्यांच्यासाठी सर्वांनी ए...

 देवळाली प्रवरा

लॉकडाऊन पडला आणि ग्रुप एकत्र आला आणि आपणही समाजातील अशाच काही लोकांसाठी संवेदना जपल्या पाहिजेत आणि त्यांच्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे यावर चर्चा झाल्या.आणि देवळाली प्रवरातील प्रयास फाउंडेशनने वृद्धाश्रमातील माता-पित्यांना उबदार कपडे वाटप करून ऊब दिली.

        यथाशक्ती समाजातील बहुसंख्य दुर्लक्षित आणि गरजू लोकांपर्यत पोहोचण्याचा प्रयास फाउंडेशन चा कयास आहे. सध्या मूठभर लोकांनी एकत्र येऊन हाती घेतलेल्या ह्या उपक्रमात आणखी संवेदनशील लोक जोडत जातील आणि आमच्या हातून अशीच सामाजिक हिताची कामे होत जातील असा आशीर्वाद  शरणपूर वृद्धाश्रम , नेवासा फाटा येथील वयोवृद्धांकडून घेऊन आज नव्या वर्षाचं स्वागत केलं.

यावेळी जर दत्तात्रय कडू , कुणाल वरखडे , विनायक चव्हाण , आकाश चव्हाण , ऋषिकेश मुसमाडे , अझर शेख , विजय खांदे, अक्षय वरखडे , अमोल लांडे ,अंकित चोरडिया , प्रवीण जाधव , गणेश जंगले , सतीश हुडे ,स्वप्नील धांभोरे , रोहित वाळके , सुजित कुलट , स्वप्नील शेटे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत