लाईट भरण्यास किमान तिन टप्प्यात सवलत द्या अन्यथा तीव्र आंदोलन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

लाईट भरण्यास किमान तिन टप्प्यात सवलत द्या अन्यथा तीव्र आंदोलन

  कोपरगाव प्रतिनिधी कोरोना काळामध्ये वाढीव विज बिले आल्याने सर्व स्तरावर सर्व पक्षाने विविध आंदोलने,मोर्चे काढल्यानंतर उर्जामंत्री  नितिनजी ...

 कोपरगाव प्रतिनिधी

कोरोना काळामध्ये वाढीव विज बिले आल्याने सर्व स्तरावर सर्व पक्षाने विविध आंदोलने,मोर्चे काढल्यानंतर उर्जामंत्री नितिनजी राऊत साहेब यांनी विज बिलात सवलत देण्याचे सांगितल्यामुळे कोरोना काळात कामधंदा नाही त्यात वाढीव विज बिलाने शॉक दिला होता. परंतु मंत्री साहेबांच्या लाईट बिलात सवलत भेटणार या वाक्यामुळे लोकांनी सवलतीच्या आशेपोटी लाईट बिल  न भरता परिवाराच्या पोटाची खळगी भरण्याचे ठरविले ते भरत असतांना हळुहळु कोरोना शिथिल होवून लोक पूर्व पदावर  येत असतांनाच विज महामंडळाने लोकांना लगेचच कोरोना काळातील  लाईट बिल भरण्यासाठी सक्ती करत  पठाणी वसुली सुरु केली आहे.

अजुन लोकांना व्यवस्थीत कामधंदा नाही. व्यवसाय सुरळीत चालत नाही त्यामुळे घराचा परिवाराचा गाडा ओढणे अवघड झाले असून महाराष्ट्र विज मंडळांनी व त्यांच्या काही कर्मचाऱ्यांनी  वरच्या आदेशाच्या नावाखाली जी पठाणी वसुली करण्याचे काम सुरु केले आहे ते त्वरीत थांबवून समस्त नागरीकांना आपण कुठलीही सवलत दिलेली नाही त्यामुळे जी आठ महिन्यापासून वाढीव विज बिलाबरोबर व्याजाच्या टक्केवारीने फुगलेली बिले भरण्यासाठी कुठलीही सोय नसल्यामुळे जनतेत असंतोष निर्माण झालेला असून देखील लाईट बिल भरण्यास तयार आहेत परंतु आपण सर्व नागरीकांचा परिवाराचा विचार करुन सदर बिलामध्ये कमीत कमी तीन टप्पे करुन सदर लाईट बिल भरुन घेण्याचे सहकार्य करावे 

अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगांव शहर व तालुक्याच्या वतीने तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने  उपकार्यकारी अभियंता कोपरगाव वीज वितरण कंपनी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनावर  शहराध्यक्ष सतिष काकडे,अनिल गाडे, विजय सुपेकर, बापू काकडे,रघुनाथ मोहिते, आनंद परदेशी,संजय जाधव, बंटी संपकळ,जावेदभाई शेख,सचिन खैरे नवनाथ मोहिते आदी मनसे कार्यकर्त्यांचा सह्या आहेत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत