देवळाली प्रवरात शनिवारी भव्य आरोग्य शिबीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात शनिवारी भव्य आरोग्य शिबीर

  देवळाली प्रवरा(वेबटीम)   देवळाली प्रवरा येथील सत्यजीत कदम फाऊंडेशनच्यावतीने शिर्डी संस्थांनचे माजी उपाध्यक्ष तथा माजी आमदार चंद्रशेखर कदम ...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)

  देवळाली प्रवरा येथील सत्यजीत कदम फाऊंडेशनच्यावतीने शिर्डी संस्थांनचे माजी उपाध्यक्ष तथा माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

 माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक व कृषीविषयक उपक्रम राबविले जातात. यंदाही देवळाली प्रवरा शहरातील श्री.समर्थ बाबुराव पाटील महाराज सांस्कृतिक भवन येथे शनिवार ६ फेब्रुवारी रोजी दिवसभरात रक्तदान शिबिर, संतुलित आहार मार्गदर्शन व उपचार, कान, नाक व घसा तपासणी, नैर्सगिक उपचार, बालरोग निदान, महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर मार्गदर्शन नेत्ररोग तपासणी तसेच मोतीबिंदू उपचार यासंदर्भात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे.

 तरी या शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन सत्यजीत कदम फाउंडेशन यांच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत