राहूरी फॅक्टरी येथे उद्या रास्ता रोको आंदोलन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी फॅक्टरी येथे उद्या रास्ता रोको आंदोलन

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहूरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे होत असलेल्या गुन्ह्यांचा पोलीस प्रशासनाने तातडीने तपास लावून कारवाई करावी ...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)

राहूरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे होत असलेल्या गुन्ह्यांचा पोलीस प्रशासनाने तातडीने तपास लावून कारवाई करावी तसेच परिसरात होत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालावा यामागणीसाठी बुधवार १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता राहूरी फॅक्टरी नगर-मनमाड मार्गावर श्रीरामपूर नाका येथे रास्ता रोको आंदोलन  राहुरी फॅक्टरी येथील विविध मित्र मंडळ संघटना व  परिसरातील नागरिकांच्यावतीने करण्यात येणार आहे.

राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून सामान्य माणसांमध्ये त्यामुळे भीती निर्माण झालेली आहे. परिसरात रस्ता लूट हा प्रकार नित्याचा झालेला आहे त्याचबरोबर परिसरातील व्यापाऱ्यांना दमबाजी करून त्यांच्याकडून काही नंगट व्यक्ती हप्ते वसुली करत आहेत व दमबाजी करत आहेत त्याचबरोबर नुकतेच परिसरातील एका शालेय विद्यार्थिनीचा अपहरणाचा प्रकार देखील समोर आलेला आहे. परिसरातील अनेक नागरिकांचे मोबाईल चोरीस गेलेले असून मुलांचा शालेय विद्यार्थिनी व सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट झालेला आहे काही चौकांमध्ये गुंडांचे अड्डे बनवले गेले आहेत यावर पोलिस प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा वचक राहिलेला नाही. आजूबाजूचे गावचे काही गुंड प्रवृत्तीचे लोक राहुरी फॅक्टरी येथे येऊन आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

              

                          जााहीरात

त्यामुळे पोलीस प्रशासनाने यास आळा घालावा म्हणून बुधवार सकाळी ९ वाजता राहूरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर  नाका येथे रस्ता रोको आंदोलन होणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत