कोपरगाव(वेबटीम) कोपरगावच्या उपनगराध्यक्षांनी सर्वप्रथम स्थायी समितीमध्ये कोपरगाव शहराची विकासकामे नामंजूर केली आणि नंतर सर्वसाधारण सभेत पु...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगावच्या उपनगराध्यक्षांनी सर्वप्रथम स्थायी समितीमध्ये कोपरगाव शहराची विकासकामे नामंजूर केली आणि नंतर सर्वसाधारण सभेत पुन्हा विकासकामे नामंजूर करण्याचा ठराव आणला. अंदाजपत्रकाला मंजुरी दिली म्हणजे विकासकाम झाले असे होते का? अंदाजपत्रक हे कामाची अंतिम मंजुरी नसून प्राथमिक कागदपत्र आहेत हेही न कळण्याइतके कोपरगावचे उपनगराध्यक्ष बालिश असतील तर कोपरगावकरांचे हे मोठे दुर्भाग्यच समजावे लागेल.अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व्हायरल होत आहे.
या व्हायरल पोस्ट मध्ये पुढे म्हंटले की, कोल्हेंच्या तालमीत तयार झालेले उपनगराध्यक्ष व नगरसेवकांकडून विकासाची अपेक्षा ठेवणे हीच सर्वात मोठी चूक आहे. ज्या उपनगराध्यक्षांना स्वतःच्या वार्डातील गटारी आणि रस्ते करता आले नाही. जे रस्ते केले त्याचाही दर्जा सांभाळता आला नाही त्यांच्याकडे शहरविकासाचे कोणते व्हिजन असणार आहे? यांच्या तोंडून विकासाच्या गप्पा ऐकणे म्हणजे भाटाच्या तोंडून कथा ऐकल्यासारखे आहे.
तुम्हाचे विकासकामांना नामंजूर करण्यामागे राजकारण आहे हे न समजण्याइतकी कोपरगाव शहराची जनता दूधखुळी नाही हे उपनगराध्यक्ष व कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी सर्वप्रथम समजून घ्यावे. आणि कोपरगाव शहराच्या विकासकामांमध्ये खोडा घालण्याची शिक्षा कोपरगावची जनता तुम्हाला लवकरच दिल्याशिवाय राहणार नाही.नेत्याला खुश करणे म्हणजे शहराचा विकास नाही जनतेला काम हवं आहे असे पोस्टमध्ये म्हंटले आहे.
दरम्यान उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर टीकास्त्र सोडले होते. त्याला प्रतिउत्तर म्हणून निखाडे यांच्यावर टीका करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते यांनी ही पोस्ट व्हायरल केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत